IPO News: नवीन वर्षात पहिला आयपीओ 9 जानेवारीला होणार खुला; 1,000 कोटी उभारण्याचा कंपनीचा प्लॅन

Jyoti CNC Automation IPO: नव्या वर्षात पहिला आयपीओ 9 जानेवारीला खुला होतोय. ज्योती सीएनसी ऑटोमेशनचा (Jyoti CNC Automation) 1000 कोटीचा आयपीओ 9 जानेवारीला उघडणार आहे. कंपनीने यासाठी 315-331 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.
Jyoti CNC Automation IPO
Jyoti CNC Automation IPOSakal
Updated on

Jyoti CNC Automation IPO: नव्या वर्षात पहिला आयपीओ 9 जानेवारीला खुला होतोय. ज्योती सीएनसी ऑटोमेशनचा (Jyoti CNC Automation) 1000 कोटीचा आयपीओ 9 जानेवारीला उघडणार आहे. कंपनीने यासाठी 315-331 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.

आयपीओ पेपर्सनुसार, या पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवण्यासाठी 11 जानेवारीपर्यंत वेळ असेल. अँकर गुंतवणूकदार 8 जानेवारीला बोली लावू शकतील.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन एअरोस्पेस, डिफेन्स आणि मेडिकल इत्यादी उद्योगांसाठी मेटल कटिंग कॉम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन्स बनवते. गेल्या महिन्यात आयपीओ लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून मान्यता मिळाली होती.

ज्योती सीएनसीने यापूर्वी 2013 मध्ये आयपीओद्वारे पैसे उभारण्यासाठी सेबीकडे अर्ज केला होता पण नंतर आपला निर्णय बदलला. आयपीओअंतर्गत कंपनी 1,000 कोटीचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. यामध्ये कोणतीही ऑफर फॉर सेल (OFS) असणार नाही.

ज्योती सीएनसी ऑटोमेशनने आपल्या कर्मचार्‍यांसाठी इश्यू अंतर्गत 5 कोटीचे शेअर्स राखून ठेवले आहेत. हे शेअर्स फायनल इश्यू प्राइसपासून प्रति शेअर 15 रुपयांच्या डिस्काउंटने जारी केले जातील.

ज्योती सीएनसीने इश्यूचे 75 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांना, 15 टक्के हाय नेट वर्थ असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी रिझर्व्ह ठेवले आहेत. बोलीसाठी लॉट साइज 45 शेअर्स आहे.

Jyoti CNC Automation IPO
Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीत मिळतोय १३ टक्के परतावा; गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 15.06 कोटीचा नफा कमावला होता. कंपनीचा एबिटदा वार्षिक 34 टक्क्यांनी वाढून 97.4 कोटी झाला आहे.

ज्योती सीएनसीकडे दोन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत. गुजरातमध्ये आणि फ्रान्समध्ये या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत. भारताव्यतिरिक्त परदेशातही त्याचे ग्राहक आहेत.

Jyoti CNC Automation IPO
LIC GST Notice: एलआयसीला मोठा धक्का! 3 राज्यांनी पाठवली 668 कोटींची जीएसटी नोटीस, काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.