KPIL: कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी; हजारो कोटींची मिळाली ऑर्डर

Kalpataru Projects International: इंजीनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपनी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलला (Kalpataru Projects International) 3,244 कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच कंपनीने अंडरग्राउंड मेट्रो रेल्वे टनल क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणाही केली.
kalpataru projects international stock
kalpataru projects international stockSakal
Updated on

Kalpataru Projects International: इंजीनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन कंपनी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलला (Kalpataru Projects International) 3,244 कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच कंपनीने अंडरग्राउंड मेट्रो रेल्वे टनल क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

अंडरग्राउंड मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या डिझाइन आणि बांधकामासाठी त्यांना ऑर्डर मिळाल्याची माहिती कंपनीने दिली. याद्वारे, कंपनी टीबीएम (टनेल बोरिंग मशीन) टनेलिंग स्कोपसह इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यवसायात प्रवेश करत आहे.

या घडामोडींमुळे कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलचे शेअर्स शुक्रवारी सकाळच्या टप्प्यात 11 टक्क्यांनी वाढले. बीएसईवर सकाळी 698.75 रुपयांवर शेअर तेजीसह उघडला. त्यानंतर लगेच त्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने 729.55 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

एनएसईवर हा स्टॉक 690 रुपयांवर उघडला आणि 728.75 रुपयांचा उच्चांक गाठला, जो एनएसईवरील 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या एका वर्षात, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये सुमारे 18 टक्के वाढ झाली आहे.

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल, पॉवर ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्यूशन, बिल्डिंग्स आणि फॅक्टरीज, वॉटर सप्लाय अँड इरीगेशन, रेल्वे, तेल आणि गॅस पाइपलाइन, अर्बन मोबिलिटी (फ्लायओव्हर्स आणि मेट्रो रेल्वे), हायवे आणि एअरपोर्ट्स सेक्टरमधील सर्वात मोठ्या इपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) कंपन्यांपैकी एक आहे.

kalpataru projects international stock
Multibagger Stock: 'या' कंपनीला मिळाली 1,750 कोटींची ऑर्डर; शेअर्समध्ये दमदार तेजी

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलने बिल्डिंग अँड फॅक्टरीज (BF) बिझनेसमध्येही ऑर्डर मिळवल्या आहेत. याशिवाय कंपनीला परदेशातील बाजारातून ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

kalpataru projects international stock
Stock To Buy: 3 महिन्यांसाठी 'हे' 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला; मिळेल दमदार परतावा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.