Kalpataru Projects: नव्या ऑर्डर्समुळे कल्पतरू प्रोजेक्ट्सचे शेअर्स उच्चांकावर, 6 महिन्यात दिला 32 टक्के परतावा

Kalpataru Projects: एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्के वाढ झाली आहे.
Kalpataru Projects wins orders worth rs 2,263 crore in India and overseas; Stock hits a record high
Kalpataru Projects wins orders worth rs 2,263 crore in India and overseas; Stock hits a record high Sakal
Updated on

Kalpataru Projects: कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडने (KPIL) नुकताच 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. हा शेअर तब्बल 8.17 टक्क्यांच्या वाढीसह 721.95 रुपयांवर गेला. नवीन ऑर्डर मिळाल्याने कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनलच्या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली. या शेअर्सने 6 महिन्यात गुंतवणूकदारांना 30% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

कल्पतरू प्रोजेक्ट इंटरनॅशनलला देशांतर्गत आणि परदेशी बाजारात 2,263 कोटींचे नवीन करार मिळाले आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन (T&D) व्यवसायाला भारत आणि परदेशी बाजारात एकूण 1,564 कोटीचे करार मिळाल्याची माहिती कंपनीने दिली.

Kalpataru Projects wins orders worth rs 2,263 crore in India and overseas; Stock hits a record high
Global Investors Summit: बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ही पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन, ऑईल अँड गॅस, रेल्वे, इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सिविल काँट्रॅक्टिंगसह वेअरहाउस अँड लॉजिस्टिक्स व्यवसायात आहे. कंपनीच्या उत्पन्नात ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन व्यवसायाचा मोठा वाटा आहे. कंपनी सध्या 30 हून अधिक देशांमध्ये प्रकल्पांवर काम करत आहे.

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनलच्या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. 6 महिन्यांत त्यांनी 32 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, एका महिन्यात या शेअरमध्ये 13 टक्के वाढ झाली आहे. 5 दिवसांत स्टॉक 10 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या वर्षी आतापर्यंत शेअर 32 टक्क्यांनी वाढला आहे.

Kalpataru Projects wins orders worth rs 2,263 crore in India and overseas; Stock hits a record high
IPO News: मुंबईतील 'या' रिअल इस्टेट कंपनीचा आयपीओ 18 डिसेंबरला उघडणार, जाणून घ्या तपशील

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.