Kalyan Jewellers Share: सलग पाचव्या दिवशी कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूक करावी का?

या आर्थिक वर्षात 52 नवीन शोरूम उघडण्याची कंपनीची योजना आहे.
Kalyan Jewellers Share
Kalyan Jewellers ShareSakal
Updated on

Kalyan Jewellers Share Price: कल्याण ज्वेलर्स इंडियाच्या (Kalyan Jewellers India) शेअर्समध्ये सलग पाचव्या दिवशी तेजी दिसली. त्याच्या शेअर्सने मंगळवारी इंट्रा-डेमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत 175.50 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.

जून 2023 तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळे सध्या हे शेअर्स तेजीत दिसत आहे. हा शेअर मंगळवारी सलग पाचव्या दिवशी वाढत सुमारे 18 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, प्रॉफिट बुकींगमुळे तो थोडा खाली आला आणि दिवसअखेर तो बीएसईवर 6.77 टक्क्यांच्या वाढीसह 175 रुपयांवर बंद झाला.

कल्याण ज्वेलर्सने शुक्रवारी अर्थात 7 जुलैला एक्सचेंज फायलिंगमध्ये त्याचे तिमाही अपडेट पाठवले. या अंतर्गत, जून तिमाहीत वार्षिक आधारावर देशांतर्गत व्यवसायातून कंपनीचा महसूल 34 टक्क्यांनी वाढला आहे. तर एकत्रित महसुली वाढ 31 टक्के होती.

कंपनीने दक्षिणेबाहेरील बाजारपेठांमध्ये 12 नवीन कल्याण शोरूम उघडले आहेत आणि दिवाळीपूर्वी आणखी 20 शोरूम उघडण्याची योजना आहे. या आर्थिक वर्षात 52 नवीन शोरूम उघडण्याची कंपनीची योजना आहे.

मिडल ईस्टमधील व्यवसायाबाबत विचार केल्यास जून तिमाहीत महसुलात वार्षिक 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण महसुलात मिडल ईस्टचा वाटा सुमारे 16 टक्के आहे. जून 2023 च्या तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारत आणि मिडल ईस्टमध्ये त्यांची एकूण 194 शोरूम आहेत.

Kalyan Jewellers Share
Small Cap Stock: 75 पैशांच्या शेअरची कमाल, 20 वर्षांत गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

एका वर्षात 180% परतावा

कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स गेल्या वर्षी 14 जुलै 2022 रोजी 62.20 रुपयांना होते. हा एक वर्षाचा नीचांक आहे. यानंतर, एका वर्षात जवळपास 182 टक्‍क्‍यांनी उसळी घेत हा शेअर आता 175.50 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या मजबूत व्यवसाय स्थितीमुळे तिच्या शेअर्सच्या वाढीला पाठिंबा मिळत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Kalyan Jewellers Share
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.