Multibagger Stock: रेल्वेकडून ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअरमध्ये अप्पर सर्किट; एका वर्षात दिला मोठा परतावा

Multibagger Stock: केर्नेक्स मायक्रोसिस्टम्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये (Kernex Microsystems India Ltd) सध्या चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. नुकतेच या शेअर्सनी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले. रेल्वेकडून मोठी ऑर्डर मिळाल्याच्या बातमीमुळे स्टॉकमध्ये दमदार खरेदी झाली आणि शेअर वाढला.
Kernex Microsystems India Ltd
Kernex Microsystems India LtdSakal
Updated on

Multibagger Stock: केर्नेक्स मायक्रोसिस्टम्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये (Kernex Microsystems India Ltd) सध्या चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. नुकतेच या शेअर्सनी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले. रेल्वेकडून मोठी ऑर्डर मिळाल्याच्या बातमीमुळे स्टॉकमध्ये दमदार खरेदी झाली आणि शेअर वाढला.

कंपनीला दक्षिण-मध्य रेल्वेकडून जेव्हीसाठी 109.465 कोटीची ऑर्डर मिळाल्याचे केर्नेक्स मायक्रोसिस्टमने स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे. सध्या हा शेअर 607.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. एका वर्षात स्टॉकचा परतावा 121% होता.

केर्नेक्स मायक्रोसिस्टम्स ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि रेल्वे मार्गांसाठी सुरक्षा प्रणाली यासारख्या सेवा देते. कंपनीने 1999 मध्ये रेल्वे संरक्षण प्रणालीचे उत्पादन सुरू केले.

Kernex Microsystems India Ltd
झेरॉक्स कंपनीचा धक्कादायक निर्णय! 3,000 कर्मचार्‍यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

केर्नेक्स मायक्रोसिस्टमच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना कायमच नफा मिळवून दिला आहे. 1 महिन्यात त्यांचे शेअर्स 11.24 टक्के, 6 महिन्यात 75 टक्के आणि 1 वर्षात 121 टक्के वाढले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 939.01 कोटी आहे. सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 4.54 कोटीचा तोटा झाला होता.

Kernex Microsystems India Ltd
Multibagger Stock: 10 वर्षात 1 लाखाचे झाले 25 लाख, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.