LIC Share Price : ‘एलआयसी’चा शेअर प्रथमच ९०० रुपयांवर

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा शेअर आज दिवसभरात ५.३० टक्के वाढ नोंदवत, ९०० रुपयांवर पोहोचला.
lic share price touch rs 900 share market stock analysis
lic share price touch rs 900 share market stock analysisSakal
Updated on

Mumbai News : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा शेअर आज दिवसभरात ५.३० टक्के वाढ नोंदवत, ९०० रुपयांवर पोहोचला. एलआयसीच्या शेअरची १७ मे २०२२ रोजी ८७५.२५ रुपयांवर नोंदणी झाली होती. आयपीओमधील त्याची किंमत ९४९ रुपये होती. नोंदणीनंतर प्रथमच या शेअरने ९०० रुपयांची उच्चतम पातळी गाठली आहे.

हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. नोंदणीनंतर, या शेअरमध्ये सतत घसरण होत होती. मार्च २०२३ पर्यंत यात लक्षणीय घसरण दिसून आली. या शेअरने ५३० रुपयांचा नीचांकही गाठला होता. मात्र, त्यानंतर यात वाढ होण्यास सुरुवात झाली. यात चांगली वाढ झाल्याने कंपनीच्या बाजारमूल्यातही वाढ झाली आहे.

नोव्हेंबरपासून आतापर्यंत, कंपनीचे बाजारमूल्य १.८४ लाख कोटी रुपयांनी वाढले असून, ते ५.६४ लाख कोटी रुपये झाले आहे. तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस सरकारचा एलआयसीमधील हिस्सा ९६.५ टक्के असून, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा एक टक्का, तर छोट्या गुंतवणूकदारांचा हिस्सा २.४ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.