एलआयसीच्या (LIC) शेअर्सने जून तिमाहीच्या निकालात 3 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्ष 2025 च्या एप्रिल-जून पहिल्या तिमाहीचे निकाल एलआयसीने गुरुवारी, 8 ऑगस्टला जाहीर केले. जून तिमाहीत, त्याचा नफा वार्षिक आधारावर 9 टक्क्यांनी वाढला आणि प्रीमियममधून निव्वळ उत्पन्न 16 टक्क्यांनी वाढले.