Larsen & Toubro: एल अँड टीला बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी मिळाली मोठी ऑर्डर; शेअरवर ठेवा लक्ष

Larsen & Toubro: 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. याच राम मंदिराचे बांधकाम देशातील प्रसिद्ध बांधकाम कंपनी लार्सन टुब्रोकडून करण्यात येत आहे. आता या कंपनीला आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.
L&T bags order for bullet train project
L&T bags order for bullet train project Sakal
Updated on

Larsen & Toubro: 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. याच राम मंदिराचे बांधकाम देशातील प्रसिद्ध बांधकाम कंपनी लार्सन टुब्रोकडून करण्यात येत आहे. आता या कंपनीला आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

लार्सन टुब्रोच्या मॅन्यूफॅक्चरिंग युनिटला देशातील बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी इलेक्ट्रिफिकेशन सिस्टम तयार करण्यासाठी मेगा ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने नुकतीच बुलेट ट्रेनची ऑर्डर जापानी एजेंसीने दिल्याची माहिती दिली.

कंपनीच्या रेल्वे स्ट्रॅटेजिक बिझनेस ग्रुपला मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पासाठी 508 किमी मार्गावर इलेक्ट्रिफिकेशन सिस्टमच्या बांधकामासाठी मेगा ऑर्डर मिळाली आहे. एल अँड टीने मंगळवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली. हा प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो.

इलेक्ट्रिफिकेशन सिस्टम तयार झाल्यानंतर देशातील पहिली बुलेट ट्रेन या मार्गावर ताशी 320 किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे. या प्रकल्पाला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीद्वारे (JICA) फायनान्स केले जात आहे.

L&T bags order for bullet train project
Aadhaar Card: EPFOने घेतला मोठा निर्णय; आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही

एल अँड टीने या कराराची रक्कम उघड केलेली नाही, पण ही ऑर्डर 10 हजार कोटीपेक्षा जास्त असल्याचे मानले जात आहे. एल अँड टीने याला मेगा ऑर्डर म्हटले आहे आणि कंपनी ऑर्डरला मेगा ऑर्डर म्हणते जेव्हा त्याचे मूल्य 10,000 ते 15,000 कोटीच्या दरम्यान असते.

गेल्या एका वर्षात एल अँड टीचे शेअर्स 61 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. 17 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 1364 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

L&T bags order for bullet train project
RBI: विकासदर सात टक्के राहण्याची शक्यता; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे दावोस येथे प्रतिपादन

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.