Mahanagar Gas च्या शेअर्समध्ये तब्बल 74% रिटर्न मिळण्याचा तज्ज्ञांना विश्वास...

ब्रोकरेजने महानगर गॅसच्या शेअर्सला बाय रेटिंग दिले आहे. तसेच, पुढील 2 वर्षांच्या कालावधीसाठी 1,719 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.
Mahanagar Gas
Mahanagar Gas sakal
Updated on

Mahanagar Gas : केंद्र सरकारने गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी नुकतेच नवे प्राईस स्ट्रक्टर लागू केले आहे. तेव्हापासून, गॅस कंपन्यांचे शेअर्स, विशेषत: सीएनजी आणि पीएनजीचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. दरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म व्हेंचुराने महानगर गॅसच्या (Mahanagar Gas) शेअर्सबाबत रिपोर्ट जारी केला आहे.

ब्रोकरेजने महानगर गॅसच्या शेअर्सला बाय रेटिंग दिले आहे. तसेच, पुढील 2 वर्षांच्या कालावधीसाठी 1,719 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. ही किंमत आताच्या किंमतीपेक्षा तब्बल 74% जास्त आहे.

दरम्यान, महानगर गॅसचे शेअर्स सध्या 992.90 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 17.48% वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 21.63% परतावा दिला आहे. (Mahanagar Gas shares likely to get 74 percent return share market news )

Mahanagar Gas
Share Market Closing: शेअर बाजारात सलग 8 व्या दिवशी तेजी; 'या' शेअर्समध्ये झाली वाढ

महानगर गॅसच्या शेअर्समधील तेजीचे येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या विक्रीत प्रचंड वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबईत मेट्रो सुरू झाल्यामुळे सीएनजी गॅसच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो असेही ब्रोकरेजने म्हटले आहे. कंपनीची विक्री आर्थिक वर्ष 2022 ते आर्थिक वर्ष 2026 मध्ये 7% पेक्षा जास्त सीएजीआरने वाढण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Mahanagar Gas
Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

मुंबई आणि बृहन्मुंबई प्रदेशात सीएनजी वाहनांना चालना देण्यासाठी नैसर्गिक वायूच्या किमतीत घट महत्त्वाची भूमिका बजावू शकते. पीएनजी अजूनही इथल्या केवळ 40% ते 50% कुटुंबांपर्यंतच पोहोचले आहे, त्यामुळे वाढीसाठी भरपूर वाव आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.