Trading Platforms: गुंतवणूकदार चिंतेत! प्रमुख ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ग्रो आणि झिरोधासह, सीडीएसएल वेबसाइट क्रॅश

CDSL Website Goes Down: भारतीय बाजारातील प्रमुख ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अडचणीचा सामना करत आहेत. ऑनलाइन गुंतवणूकदारांच्या मते, Zerodha आणि Groww सह लोकप्रिय ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार होत नाहीत.
CDSL Website Goes Down
CDSL Website Goes DownSakal
Updated on

CDSL Website Goes Down: भारतीय बाजारातील प्रमुख ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अडचणीचा सामना करत आहेत. ऑनलाइन गुंतवणूकदारांच्या मते, Zerodha आणि Groww सह लोकप्रिय ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार होत नाहीत. 1 जूनच्या एक्झिट पोलनंतर शेअर बाजार उच्चांकावर उघडले. आज सोमवारी 3 जून रोजी दिवसाच्या व्यापाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी 3 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी बाजार सर्वकालीन उच्चांकावर उघडल्यानंतर भारतीय बाजारातील प्रमुख ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रॅश झाले आहेत. या एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी सलग तिसऱ्या टर्मचा अंदाज वर्तवला आहे. सोशल मीडियावरील गुंतवणूकदारांच्या मते, सीडीएसएल वेबसाइट डाउन झाल्यानंतर झेरोधा, ग्रो आणि अपस्टॉक्ससह लोकप्रिय ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार होत नाहीत.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) या भारतातील केंद्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरीज आहेत. या व्यापार आणि गुंतवणूक सेवा देतात. दोन्ही सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा SEBI द्वारे नियंत्रित केल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल 1 जून रोजी जाहीर झाले त्यानंतर शेअर बाजारात तेजी आली आहे.

CDSL Website Goes Down
Share Market Opening: एक्झिट पोलनंतर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास
CDSL Website Goes Down
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक 7 जूनला रेपो दर करणार जाहीर; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

1 जून रोजी एक्झिट पोलच्या झंझावातानंतर, सोमवारी भारतीय बाजार वाढीसह उघडले, सेन्सेक्स 2568.19 अंकांनी वाढून 76,529.50 वर आणि निफ्टी 578.70 अंकांनी वाढून 23,109.40 वर व्यवहार करत आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी बँक 1,398 अंकांनी वाढून 50,382 वर व्यवहार करत होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.