IPO Alert: शेअर बाजारात धमाका! 151 कोटींच्या IPO साठी 24,000 कोटींची बोली, काय करते मुंबईची कंपनी?

Manba Finance IPO: मुंबईस्थित NBFC मानबा फायनान्सच्या IPO ला शेअर बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी हा IPO 224 वेळा सबस्क्राइब केला आहे. ही NBFC कंपनी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी वित्तपुरवठा करते.
Manba Finance IPO
Manba Finance IPOSakal
Updated on

Manba Finance IPO: मुंबईस्थित NBFC मानबा फायनान्सच्या IPO ला शेअर बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. गुंतवणूकदारांनी हा IPO 224 वेळा सबस्क्राइब केला आहे. ही NBFC कंपनी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी वित्तपुरवठा करते.

कंपनीचे उद्दिष्ट 151 कोटी रुपये उभारण्याचे होते परंतु आता शेअर्सची मागणी वाढून सुमारे 24,000 कोटी रुपये झाली आहे. याशिवाय कंपनीने गेल्या आठवड्यात अँकर गुंतवणूकदारांना 45 कोटी रुपयांच्या शेअर्सचे वाटप केले होते.

संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या भागाला 149 पट अधिक सब्सक्रिप्शन मिळाले आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या शेअर्सना 144 पट अधिक सब्सक्रिप्शन मिळाले आहे. IPO ची किंमत 114 ते 120 रुपयांच्या दरम्यान आहे. सोमवार, 30 सप्टेंबर रोजी BSE आणि NSE वर कंपनी लिस्ट होण्याची अपेक्षा आहे.

यावर्षी आतापर्यंत 84,900 कोटी जमा झाले आहेत

अलीकडच्या काळात भारतीय शेअर बाजारात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. कोरोनानंतर लोकांचा हा कल झपाट्याने वाढला आहे. 2023 मध्ये 61 कंपन्यांनी IPO द्वारे सुमारे 73,100 कोटी रुपये उभे केले होते.

Manba Finance IPO
Success Story: 5 लाखांचे कर्ज घेतले; 'सॉरी मॅडम' नावाने सुरु केले कपड्यांचे दुकान, आज आहे 150 कोटींचा ब्रँड

परंतु चालू वर्षात 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कंपन्यांनी IPO द्वारे सुमारे 84,900 कोटी रुपये उभे केले आहेत. भारतीय बाजारपेठेत IPO बाबत प्रचंड क्रेझ असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

Manba Finance IPO
Gold All Time High: सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर; रिटर्नच्या बाबातीत सर्व मालमत्ता वर्गांना टाकले मागे

गुंतवणूकदारांचे मध्यम आकाराच्या कंपन्यांवर लक्ष

लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्यावरही गुंतवणूकदारांचा भर आहे. काही दिवसांपूर्वीच टू शोरूम असलेल्या दुचाकी डीलरशिपला 12 कोटी रुपयांच्या ऑफरसाठी 4,800 कोटी रुपयांची बोली लागली होती.

IPO कडे गुंतवणूकदारांची वाढती क्रेझ पाहता, अलीकडेच SEBI ने कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सावध राहण्याचा इशारा दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.