Bangladesh Crisis: बांगलादेशच्या राजकीय संकटाची झळ भारतालाही; गुंतवणूकदार विकत आहेत 'या' कंपनीचे शेअर्स

Marico share price: ठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, एफएमसीजी कंपनी मॅरिको लिमिटेडच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आणि किंमत 642 रुपयांपर्यंत पोहोचली. 30 जुलै 2024 रोजी हा शेअर 690.95 च्या पातळीवर होता.
Marico share price
Marico share priceSakal
Updated on

Marico share price: बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय संकटाचा परिणाम भारतीय कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला आहे. यापैकी एक शेअर मॅरिको लिमिटेड आहे. मंगळवारी, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, एफएमसीजी कंपनी मॅरिको लिमिटेडच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आणि किंमत 642 रुपयांपर्यंत पोहोचली. 30 जुलै 2024 रोजी हा शेअर 690.95 च्या पातळीवर होता.

मॅरिको कंपनीचे शेअर्स का कोसळत आहेत?

मॅरिकोच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या उत्पन्नाचा मोठा भाग बांगलादेशातून येतो. कंपनीच्या एकूण उत्पन्नात या देशाचा वाटा एक चतुर्थांश आहे. मॅरिकोच्या उत्पन्नापैकी सुमारे 12% टक्के भाग हा बांगलादेशच्या बाजारातून येतो. मॅरिको बांगलादेशातील 5 पैकी 4 घरांपर्यंत पोहोचल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मॅरिको कंपनीचा आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस बांगलादेशमधून 51% आंतरराष्ट्रीय महसूल आला होता. आर्थिक वर्ष 2027च्या अखेरीस 40% पर्यंत कमी करण्याचा त्यांचा मानस आहे. वितरण आणि मागणी सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षांत 80 कोटी ते 100 कोटी खर्च करण्याची कंपनीची योजना आहे.

Marico share price
Who is Muhammad Yunus: बांगलादेशचे पंतप्रधानपद नोबेल विजेत्याला देण्याची मागणी! कोण आहेत मोहम्मद युनूस?

जून तिमाहीचे निकाल कसे होते?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मॅरिको लिमिटेडचा नफा 8.71 टक्क्यांनी वाढून 474 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 436 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 6.7 टक्क्यांनी वाढून रु. 2,643 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 2,477 कोटी होते.

सॅफोला, पॅराशूट आणि लिव्हॉन सारख्या लोकप्रिय ब्रँडची मालकी असलेल्या मॅरिकोच्या एकूण मार्जिनमध्ये 2.3 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, त्याचा एकूण खर्च 6.08 टक्क्यांनी वाढून 2,075 कोटी रुपये झाला आहे.

Marico share price
Stock Market: शेअर बाजाराचा बबल फुटला? वॉरेन बफे इंडिकेटरने अगोदरच केली होती भविष्यवाणी; पुढे काय होणार?

भारताचा शेजारी बांगलादेश सध्या राजकीय संकटातून जात आहे. आरक्षणावरून झालेल्या गदारोळानंतर जमाव इतका आक्रमक आणि हिंसक झाला की, पंतप्रधान शेख हसीना यांनाही 'सुरक्षित स्थळी' देश सोडून जावे लागले. शेख हसीना पायउतार झाल्या असून आता लष्कर देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.