BSE Market Cap: भारतीय शेअर बाजाराने रचला इतिहास; बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

Market cap of BSE-listed companies: या वर्षाच्या सुरुवातीपासून, बाजार भांडवलात 633 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. BSE सेन्सेक्स अजूनही 1.66% त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली आहे, तर BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने 21 मे रोजी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
Market cap of BSE-listed companies hits 5 trillion Dollar first time ever
Market cap of BSE-listed companies hits 5 trillion Dollar first time ever Sakal
Updated on

Market cap of BSE-listed companies: बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने 21 मे रोजी नवीन उच्चांक गाठला. प्रथमच कंपन्यांचे मार्केट कॅप 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) वेबसाइटनुसार, एक्स्चेंजमध्ये लिस्टेड सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 21 मे रोजी 412 लाख कोटी रुपयांच्यावर गेले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून, मार्केट कॅपमध्ये 633 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. BSE सेन्सेक्स अजूनही 1.66% त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली आहे, तर BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने 21 मे रोजी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Market cap of BSE-listed companies hits 5 trillion Dollar first time ever
Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

नोव्हेंबर 2023 मध्ये BSE चे एकूण बाजार भांडवल 4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते आणि आता फक्त 6 महिन्यांत ते 5 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप मे 2007 मध्ये 1 ट्रिलियन डॉलर होते. यानंतर, 2 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्यासाठी एक दशक लागले आणि जुलै 2017 मध्ये मार्केट कॅपने हा आकडा ओलांडला. मे 2021 मध्ये, मार्केट कॅपने 3 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला.

सध्या जगभरातील केवळ 4 देशांच्या शेअर बाजाराचे मार्केट कॅप 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. अमेरिका 55.65 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपसह आघाडीवर आहे. त्यानंतर चीन (9.4 ट्रिलियन डॉलर), जपान (6.42 ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (5.47 ट्रिलियन डॉलर) यांचा क्रमांक लागतो.

Market cap of BSE-listed companies hits 5 trillion Dollar first time ever
Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, भारताच्या मार्केट कॅप 2024 मध्ये आतापर्यंत सुमारे 12 टक्के वाढ झाली आहे, तर या काळात अमेरिकन बाजारपेठेत 10 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय हाँगकाँगचा बाजार 16 टक्क्यांनी वाढला आहे. चीन आणि जपानचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर स्थिर राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.