Texmaco Rail: शॉर्ट टर्मसाठी 'या' दोन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला

KNR Constructions: शेअर बाजारत सध्या तेजीचे वातावरण आहे, अशात नेमक्या कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची याचा अंदाज येत नाही.
KNR Constructions And Texmaco Rail
KNR Constructions And Texmaco RailEsakal
Updated on

शेअर बाजारत सध्या तेजीचे वातावरण आहे, अशात नेमक्या कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची याचा अंदाज येत नाही. त्यामुळेच सेठी फिनमार्टचे विकास सेठी यांनी गुंतवणूकदारांसाठी कॅश मार्केटमधील दोन शेअर्सची निवड केली आहे.

यात केएन आर कन्स्ट्रक्शन्स (KNR Constructions) आणि टेक्समॅको रेल (Texmaco Rail) यांचा समावेश आहे. या शेअर्ससाठी शॉर्ट टर्म टारगेट काय आहे,आणि घसरण झाल्यास स्टॉपलॉस कितीर ठेवावा लागेल याबाबत माहिती दिली आहे.

केएनआर कन्स्ट्रक्शन

इन्फ्रा सेक्टरमधील कंपनी केएनआर कन्स्ट्रक्शनचा (KNR Constructions) शेअर सध्या दीड टक्क्यांच्या वाढीसह 350 रुपयांवर ट्रेड करत आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण बुधवारी संपुष्टात आली. त्याने इंट्राडेमध्ये नुकताच 353 रुपयांचा उच्चांक गाठला. अशात विकास सेठींनी 340 रुपयांच्या स्टॉपलॉससह 365 रुपयांचे टारगेट दिले आहे. ही कंपनी रोड, ब्रिज, फ्लायओवर, इरिगेशन प्रोजेक्ट्स अशी कामे करते. ग्राहकांची लिस्ट मजबूत आहे आणि आजपर्यंत प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेवर झाली आहे जो कंपनीचा एक्स फॅक्टर आहे.

KNR Constructions And Texmaco Rail
Titagarh Rail Systems Ltd : टिटागढ रेल सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील, ब्लॅकरॉकने खरेदी केले 153 कोटीचे शेअर्स...

टेक्समॅको रेल

तज्ज्ञांनी दुसरा शेअर निवडला आहे तो म्हणजे रेल्वे स्टॉक टेक्समॅको रेलचा (Texmaco Rail) आहे. हा शेअर साडेतीन टक्क्यांच्या वाढीसह 221 रुपयांवर ट्रेड करतआहे. या शेअरसाठी 235 रुपयांचे शॉर्ट टर्म टारगेट आणि 210 रुपयांवर स्टॉपलॉसचा सल्ला देण्यात आला आहे. ही कंपनी रेल्वे वॅगन्स बनवते. याशिवाय ते रेल्वे ट्रॅकसह ईपीसी प्रोजेक्ट्सही करते. कंपनीची 8000 कोटीची मोठी ऑर्डर बुक आहे. सध्या कंपनीच्या डिमर्जरचीही चर्चा आहे, ज्यामुळे व्हॅल्यू अनलॉकिंग होईल. एका आठवड्यात हा शेअर सुमारे 7 टक्क्यांनी वाढला आहे.

KNR Constructions And Texmaco Rail
Amara Raja Energy : अमरा राजा एनर्जीच्या शेअर्समध्ये 2 दिवसांत 21% वाढ, शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला...

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.