Maruti Suzuki : मारुतीचे शेअर्स पहिल्यांदाच 13000 रुपयांवर ; प्रॉफीट बूक करावे की आणखी तेजी येणार ?

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या शेअर्सने (Maruti Suzuki) मंगळवारी पहिल्यांदाच 13 हजारांची पातळी ओलांडली. कंपनी मार्च 2024 तिमाहीचे निकाल शुक्रवारी अर्थात 26 एप्रिलला सादर करेल आणि त्यापूर्वीच्या तेजीमध्ये, शेअर्सने मंगळवारी नवा उच्चांक गाठला.
Maruti Suzuki
Maruti Suzukisakal
Updated on

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या शेअर्सने (Maruti Suzuki) मंगळवारी पहिल्यांदाच 13 हजारांची पातळी ओलांडली. कंपनी मार्च 2024 तिमाहीचे निकाल शुक्रवारी अर्थात 26 एप्रिलला सादर करेल आणि त्यापूर्वीच्या तेजीमध्ये, शेअर्सने मंगळवारी नवा उच्चांक गाठला. प्रॉफिट बुकींग असूनही दिवसअखेरीस तो चांगल्या वाढीसह बंद झाला. सध्या हे शेअर्स बीएसईवर 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 12974.35 रुपयांवर ट्रेड झाले. इंट्रा-डेमध्ये तो 1.91 टक्क्यांच्या वाढीसह 13023.00 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅपही 4 लाख कोटीच्या पुढे गेले आहे. सध्या त्याचे पूर्ण मार्केट कॅप 4,07,916.90 कोटी आहे.

मारुतीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी 25 एप्रिल 2023 रोजी तो 8,421.75 रुपये होता. त्याच्या शेअर्ससाठी हा एक वर्षाचा विक्रमी नीचांक आहे. या स्तरावरून, एका वर्षात सुमारे 55 टक्क्यांनी झेप घेतली आणि आता तो 13,023.00 रुपयांवर पोहोचला, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे. या वर्षी ते आतापर्यंत 26 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.

Maruti Suzuki
Share Market Update : ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जबरदस्त ऍक्शन, नवा उच्चांक गाठला...

मार्च तिमाही साधारणपणे वार्षिक आणि त्रैमासिक आधारावर प्रवासी वाहन कंपन्यांसाठी सर्वोत्तम तिमाही असल्याचे मत देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केले आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने 13500 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे. मारुतीला हायब्रीड कर टॅक्सेशन अनुकूल असल्याने सर्वाधिक फायदा मिळू शकतो आणि असे झाल्यास त्याचे पुन्हा रेटिंग करावे लागेल. तर ब्रोकरेज फर्म सेंट्रमने त्याचे टारगेट 15082 रुपये निश्चित केले आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये एसयूव्ही आणि ईव्ही सेगमेंटमध्ये प्रवेशाच्या शक्यतेमुळे मारुतीच्या व्यवसायाला चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.