Maruti Suzuki: मारुतीने सुझुकीकडून गुजरात प्लांटच्या अधिग्रहणासाठी प्रेफरेंशियल बेसिसवर शेअर्सला दिली मंजूरी

Maruti Suzuki: बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Maruti-suzuki
Maruti-suzukiSakal
Updated on

Maruti Suzuki: मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड गुजरात प्लांट खरेदी करण्यासाठी पॅरेंट कंपनी सुझुकी मोटर कॉर्प (SMC) ला प्रेफरेंशियल बेसिसवर इक्विटी शेअर्स जारी करणार आहे

एक्सचेंज फाइलिंगनुसार, बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत यासाठी दोन पर्याय देण्यात आले होते रोख पेमेंट आणि इक्विटी शेअर्स जारी करणे या दोन पर्यायांवर विचार करण्यात आला, शेवटी इक्विटी शेअर्स जारी करण्याचा निर्णय हा मायनॉरिटी शेअरहोल्डर्स आणि कंपनीसाठी अधिक फायदेशीर असल्याचे ठरवण्यात आले.

शेअर्सची एकूण संख्या, इश्यू प्राईस आणि गुंतवणूकदारांच्या पोस्ट अलॉटमेंट होल्डिंगचा निर्णय दुसऱ्या बोर्डाच्या बैठकीत नंतर घेतला जाईल. या खरेदीची प्रक्रिया आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण व्हावी, अशी कंपनीची इच्छा आहे.

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी माहिती दिली की, प्लांटच्या विक्रीनंतर, मारुती सुझुकीमधील सुझुकी मोटर कॉर्पची हिस्सेदारी सध्याच्या 56.48% वरून 58.28% पर्यंत वाढेल.

Maruti-suzuki
प्रभावी गुंतवणूक पर्याय

शेअर स्वॅप पर्याय का निवडला?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या नफा, EPS आणि शेअरधारकांना 2031 पर्यंत प्रत्येक वर्षासाठी डिव्हीडंट वर काय प्रभाव पडेल याचा विचार करण्यात आला . डेटा नुसार PAT, EPS आणि पेएबल डिव्हिडेंड हे FY31 पर्यंत शेअर-स्वॅप पर्यायामध्ये जास्त असणार आहेत.

याचे मुख्य कारण म्हणजे, स्वॅप ऑप्शनमध्ये व्याज उत्पन्नातून अतिरिक्त कमाई होत आहे आणि इक्विटी डायल्युशन कमी होत आहे., कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अजय सेठ यांनी सांगितले की, स्टेक डायल्युशन 4% पेक्षा किंचित जास्त असेल. मारुती सुझुकी आता सर्वसाधारण सभेद्वारे किंवा पोस्टल बॅलेटद्वारे शेअर जारी करण्यासाठी शेअर होल्डर्सची मान्यता घेईल.

Maruti-suzuki
Ambareesh Murty Journey : शून्यातून उभे केले 'पेपरफ्राय'चे साम्राज्य! असा होता अंबरीश मूर्ती यांचा प्रवास

मारुती सुझुकी, सुझुकी मोटर गुजरातमध्ये 12,755 कोटी रुपयांच्या नेट बुक व्हॅल्यूमध्ये 1,275.5 कोटी शेअर्स विकत घेईल, असे सुझुकी मोटरने जाहीर केले आहे.

गेल्या महिन्यात, कंपनीच्या बोर्डाने सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेटच्या जपानी मूळ कंपनीकडून संपादन करण्यास मान्यता दिली. उत्पादनाशी संबंधित सर्व योजना भारतीय ऑपरेशन्स अंतर्गत आणणे हा यामागचा उद्देश होता.

चेअरपर्सन आर सी भार्गव यांनी पहिल्या तिमाहीत कंपनीच्या कामगिरीबद्दल माहिती देताना सांगितले होते की, याचा खर्च किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणताही फायदा होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.