Maxposure Limited IPO: मॅक्सपोजर लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला; तुम्ही तयार आहात ना?

Maxposure Limited IPO: मॅक्सपोजर लिमिटेडचा (Maxposure Limited) आयपीओ आजपासून खुला होणार आहे. यामध्ये 15 ते 17 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी आहे. मॅक्सपोजर लिमिटेडची स्थापना ऑगस्ट 2006 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी विविध प्लॅटफॉर्मवर पर्सनलाइज्ड मीडिया आणि एंटरटेन्मेंट सर्व्हिसेस देते.
Maxposure Limited IPO
Maxposure Limited IPOSakal
Updated on

Maxposure Limited IPO: मॅक्सपोजर लिमिटेडचा (Maxposure Limited) आयपीओ आजपासून खुला होणार आहे. यामध्ये 15 ते 17 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी आहे. मॅक्सपोजर लिमिटेडची स्थापना ऑगस्ट 2006 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी विविध प्लॅटफॉर्मवर पर्सनलाइज्ड मीडिया आणि एंटरटेन्मेंट सर्व्हिसेस देते.

कंपनी इनफ्लाइट एंटरटेन्मेंट, कंटेंट मार्केटिंग, टेक्नोलॉजी आणि एडव्हर्टायझिंगमधील दिग्गज कंपनी आहे. कंपनीच्या सर्व्हिसेसमध्ये कस्टम एडिटिंग, सबटायटलिंग, मेटाडेटा क्रिएशन, डुप्लिकेशन, ऑडिओ एन्हांसमेंट, एन्कोडिंग/ट्रान्सकोडिंग आणि पोस्ट प्रोडक्शन सर्विसेजचा समावेश आहे.

मॅक्सपोजर लिमिटेडच्या आयपीओसाठी प्राइस बँड रुपये 31-33 प्रति शेअर आहे. 20.26 कोटींच्या या आयपीओमध्ये 61.4 लाख नवीन शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये विक्रीसाठी कोणतीही ऑफर असणार नाही. गुंतवणूकदार 4000 शेअर्समध्ये बोली लावू शकतील.

Maxposure Limited IPO
Multibagger Stock: गुंतवणूकदार कोट्यधीश! 100 रुपयांचा शेअर अवघ्या 3 वर्षांत 11,000 रुपयांवर

मॅक्सपोजर आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर जीवायआर कॅपिटल ऍडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत. गिरीराज स्टॉक ब्रोकिंग या इश्यूची मार्केट मेकर आहे.

मॅक्सपोजर लिमिटेड आयपीओअंतर्गत, क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी 50 टक्के हिस्सा, रिटेल इनवेस्टर्ससाठी 35 टक्के आणि नॉन इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी 15 टक्के हिस्सा राखीव आहे.

फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी कंपनी आयपीओमधून मिळणारे उत्पन्न वापरेल.

Maxposure Limited IPO
Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कशी असेल बाजाराची स्थिती? काय सांगतात तज्ज्ञ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.