Motisons Jewellers IPO: मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ आज होतोय खुला; तुम्ही तयार आहात ना?

Motisons Jewellers IPO: आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 52 ते 55 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे
Motisons Jewellers IPO opens today. GMP, price, subscription status, other details
Motisons Jewellers IPO opens today. GMP, price, subscription status, other details Sakal
Updated on

Motisons Jewellers IPO: डिसेंबर महिन्यात बऱ्याचशा आयपीओने आपले नशीब आजमावले आहे. अशात आता जयपूरच्या रिटेल ज्वेलरी कंपनी मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ आज 18 डिसेंबरला खुला होणार आहे आणि तो 20 डिसेंबरला बंद होईल.

या आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 52 ते 55 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे. आयपीयोमध्ये संपूर्णपणे 2.74 कोटी इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये कोणतीही ऑफर फॉर सेल नाही. कंपनीने ऑक्टोबरमध्ये आयपीओपूर्वी 33 कोटी उभारले होते.

मोतीसन्स ज्वेलर्स ही 20 वर्षांपासून प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड कंपनी आहे. कंपनीची सुरुवात जयपूरच्या जोहरी बाजारमध्ये एका छोट्याशा दुकानातून झाली. पण कंपनीने राजस्थानमध्ये स्वतःचे ब्रँड स्टोअर स्थापन केले आहे. कंपनी पारंपारिक, कंटेम्पररी आणि फ्यूजन डिझाइन प्रोडक्ट्स तयार करते.

Motisons Jewellers IPO opens today. GMP, price, subscription status, other details
Railway Stock: रेल्वे शेअर्स सुसाट! 485 कोटींची ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअर्समध्ये तुफान तेजी

मोतीसन्स ज्वेलर्सच्या आयपीओची (IPO) लॉट साइज 250 शेअर्सची आहे. गुंतवणूकदार किमान 250 शेअर्स आणि 250 च्या पटीत शेअर्ससाठी अप्लाय करू शकतात. कंपनी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 2 कोटी 74 लाख 71 हजार फ्रेश इक्विटी शेअर जारी करेल.

कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर शेड्युल्ड कमर्शियल बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी करेल. याशिवाय कंपनी या निधीचा वापर वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करेल.

Motisons Jewellers IPO opens today. GMP, price, subscription status, other details
Multibagger Stock: लिस्टिंगनंतर 5 महिन्यातच स्टॉक स्प्लिटची घोषणा; कंपनीचा शेअर अप्पर सर्किटवर

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.