Motisons Jewellers IPO Listing: आयपीओ लिस्टिंगसाठी मंगळवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. शेअर बाजारात 3 कंपन्यांच्या IPOची लिस्टिंग झाली. यातील 2 कंपन्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली, तर एका कंपनीने गुंतवणूकदारांच्या बॅगा आधीच भरल्या आहेत. यामध्ये मोतीसन्स ज्वेलर्सच्या IPOचा समावेश आहे. या आयपीओने शेअर बाजारात येताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
IPOने लिस्टच्या दिवशीच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. हा शेअर NSE वर 98.18 टक्के प्रीमियमसह 109 रुपयांवर लिस्ट झाला तर, BSE वर हा शेअर 103.90 रुपयांवर लिस्ट झाला.
Motisons Jewellers IPO चा आकार 151 कोटी रुपये होता. या IPO मध्ये, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 50 टक्के, गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला होता.
हा IPO 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. कंपनीने शेअर्सची किंमत 52 रुपये ते 55 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित केली होती. या IPO मध्ये, गुंतवणूकदार एकाच वेळी एकूण 250 शेअर्स खरेदी करू शकत होते.
मुथूट मायक्रोफिनच्या IPOने केले गुंतवणूकदारांचे नुकसान
मुथूट मायक्रोफिनच्या लिस्टिंगने गुंतवणूकदारांची निराशा केली. इश्यू किंमतीच्या तुलनेत ही कंपनी सवलतीत लिस्ट करण्यात आली. मुथूट मायक्रोफिनलाही ग्रे मार्केटमधून मंदीचे संकेत मिळत होते. कंपनी प्रति शेअर 291 रुपयांच्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 5% डिस्काउंटसह 278 रुपयांच्या प्रति शेअरवर लिस्ट झाली.
मुथूट मायक्रोफिनचे शेअर्स NSE वर 5.40% च्या सवलतीतसह 275.30 रुपयांवर लिस्ट झाले. तर बीएसईवर 4.45% च्या सवलतीतसह 278 रुपयांवर लिस्ट झाले. या IPO ची किंमत 277-291 रुपयांच्या दरम्यान होती.
मुथूट मायक्रोफिन ही एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे जी महिला ग्राहकांना लहान कर्ज देते. या कंपनीचे लक्ष भारतातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांवर आहे, ज्यांना लहान कर्जाची गरज आहे. ही देशातील 5वी NBFC-MFI (मायक्रो-फायनान्स संस्था) आहे. ही कंपनी दक्षिण भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या IPOने केली निराश
रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी सूरज इस्टेट डेव्हलपर्सचे शेअर्स मंगळवारी लिस्ट झाले. हा शेअर बीएसईवर 4.5 टक्के सवलतीसह देऊन 343 रुपयांवर लिस्ट झाला. शेअर NSE वर 5.56% च्या सवलतीसह 340 रुपयांवर लिस्ट झाला होता, तर इश्यू किंमत 360 रुपये प्रति शेअर होती. कंपनीने 400 कोटी रुपये उभारण्यासाठी पब्लिक इश्यू लॉन्च केला होता.
सूरज इस्टेट डेव्हलपर्स ही मुंबईमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील एक बांधकाम कंपनी आहे. कंपनीने या क्षेत्रात आतापर्यंत 42 प्रकल्प पूर्ण केले आहेत. 13 प्रकल्प चालू आहेत, तर 16 प्रकल्प हातात आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.