Stock Split : 'या' शेअरकडून स्टॉक स्प्लिटची घोषणा, अधिक जाणून घेऊयात...

बोर्ड ऑफ डारेक्टर्सच्या बैठकीत शेअर्स स्प्लिटला मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
 Mufin Green Finance stock
Mufin Green Finance stocksakal
Updated on

Stock Split : मफिन ग्रीन फायनान्सने (Mufin Green Finance) आपले शेअर्स 1:2 च्या प्रमाणात म्हणजेच स्टॉक स्प्लिटमध्ये शेअर करण्याची घोषणा केली आहे. बोर्ड ऑफ डारेक्टर्सच्या बैठकीत शेअर्स स्प्लिटला मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

आता कंपनी 1:2 च्या प्रमाणात शेअर्सचे विभाजन केले जाणार आहे, म्हणजे कंपनी तिच्या प्रत्येक शेअर्सचे दोन लहान भागांमध्ये विभाजन करेल.  2 रुपये फेस व्हॅल्यूचे शेअर्स 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूच्या दोन इक्विटी शेअर्समध्ये स्प्लिट करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याचे मफिन ग्रीन फायनान्सने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फायलींगमध्ये म्हटले आहे.

 Mufin Green Finance stock
Stock Split : स्टॉक स्प्लिटनंतर या शेअरमध्ये तेजी, 6 महिन्यात 76% रिटर्न...

दरम्यान, मफिन ग्रीन फायनान्सचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 1.35% घसरून 259 रुपयांवर बंद झाली. हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गणला जातो. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत सुमारे 348.87% वाढली आहे.

मुफिन ग्रीन फायनान्सचे शेअर्स 27 डिसेंबर 2019 रोजी केवळ 18.95 रुपयांना होते. आता त्याची किंमत 259 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच गेल्या साडेतीन वर्षांत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1,266.75% परतावा दिला आहे.

मफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड 651.54 कोटी मार्केट कॅप असलेली स्मॉल-कॅप कंपनी आहे. ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे, जी इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज देते.

 Mufin Green Finance stock
Multibagger Stock: 'या' Smallcap Stockची कमाल, 6 महिन्यात 1 लाखाचे 25 लाख...

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर्सचे विभाजन. सहसा जेव्हा शेअर्सची किंमत जास्त असते तेव्हा कंपनी लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपले शेअर्स विभाजित करते. यामुळे शेअर्सची किंमत स्वस्त होते आणि कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या वाढते.

 Mufin Green Finance stock
Multibagger Stock: 'या' Smallcap Stockची कमाल, 6 महिन्यात 1 लाखाचे 25 लाख...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.