Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या नव्या कंपनीची शेअर बाजारात एंट्री, अदानींच्या 'या' कंपनीला टाकले मागे

नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
Gautam Adani Mukesh Ambani
Gautam Adani Mukesh AmbaniSakali
Updated on

Mukesh Ambani: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी गुरुवारी भारतीय अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळी झाली आहे. या नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

मूल्यानुसार, कंपनी सुमारे 20 अब्ज डॉलर्सची कंपनी म्हणून उदयास आली आहे. ही अंदाजे किंमत कंपनीला मूल्यांकनाच्या बाबतीत कोल इंडिया, इंडियन ऑइल सारख्या सर्व मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

भारतातील टॉप-40 कंपन्यांमध्ये समाविष्ट

मुकेश अंबानींच्या या वित्तीय सेवा कंपनीचे डिमर्जर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, गुरुवार, 20 जुलै रोजी झाले. त्याच्या शेअरची किंमत निश्चित करण्यासाठी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने एक तासाचे विशेष प्री-ओपन सत्र आयोजित केले होते.

या कालावधीत Jio Fin च्या स्टॉकची किंमत 261.85 रुपये इतकी निश्चित करण्यात आली, जी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली होती.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, Jio Fin चे मूल्यांकन 20 बिलियन डॉलर इतके आहे आणि या किंमतीसह, ती देशातील एक किंवा दोन नव्हे तर बाजार भांडवलाच्या बाबतीत टॉप-40 भारतीय कंपन्यांपैकी एक बनली आहे. (Jio Financial Services Become India's 2nd Biggest NBFC; 20 Billion dollar Valuation On Day 1)

अंबानींची रिलायन्स पहिल्या क्रमांकावर

जर आपण देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांबद्दल बोललो तर मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

अंबानींची नवीन कंपनी जिओ फायनान्शिअल अंदाजे 20 अब्ज डॉलर बाजार मूल्यासह देशातील 32 वी सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून उदयास आली आहे.

अशा स्थितीत मार्केट कॅपच्या बाबतीत ही कंपनी गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, कोल इंडिया, इंडियन ऑइल आणि बजाज ऑटोसारख्या कंपन्यांना मागे टाकत असल्याचे दिसते.

Gautam Adani Mukesh Ambani
Stock Market Crash: शेअर बाजार क्रॅश, 2 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 2.14 लाख कोटी रुपये पाण्यात, नेमक काय झालं?

गुंतवणूकदारांसाठी काय बदल होणार?

2022 मध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीचे आकडे सादर करताना, रिलायन्सने आपला वित्तीय सेवा व्यवसाय रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (RSIL) वेगळे करण्याची घोषणा केली होती आणि Jio Financial Services Limited या नवीन नावाने स्टॉक एक्सचेंजवर स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याची योजना आखली होती.

NCLT च्या मुंबई खंडपीठाने 28 जून रोजी या डिमर्जरला मंजुरी दिली होती. ही कंपनी निफ्टी 50 सह प्रमुख भारतीय निर्देशांकात समाविष्ट केली जाईल, परंतु सूचीबद्ध होईपर्यंत गुंतवणूकदारांना व्यापार करता येणार नाही.

Gautam Adani Mukesh Ambani
हातातला Mobile आणि समोरचा Computer केव्हा बंद करायचा याचं हवं भान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.