Upcoming IPO 2024: पैसे तयार ठेवा! अंबानी आणि टाटा गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लवकरच IPO आणणार

IPO 2024: जगातील अनेक देश मंदीच्या गर्तेत आहेत पण भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी देशात विक्रमी आयपीओ शेअर बाजारात दाखल झाले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील दोन वर्षांत भारतातील प्राथमिक बाजारपेठेत मोठ्या कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता आहे.
Mukesh ambani RIL and rata tata company to launch IPO 2024 year
Mukesh ambani RIL and rata tata company to launch IPO 2024 year Sakal
Updated on

Stock Market Upcoming IPO 2024: जगातील अनेक देश मंदीच्या गर्तेत आहेत पण भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी देशात विक्रमी आयपीओ शेअर बाजारात दाखल झाले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील दोन वर्षांत भारतातील प्राथमिक बाजारपेठेत मोठ्या कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. (Mukesh ambani RIL and rata tata company to launch IPO 2024 year)

या वर्षी मुकेश अंबानी आणि टाटा समूह शेअर बाजारात आयपीओ आणू शकतात. गेल्या वर्षी देशात 243 कंपन्यांची नोंदणी झाली होती. ही संख्या 2022 च्या तुलनेत 65 टक्क्यांनी अधिक आहे. पुढील दोन वर्षात अनेक मोठ्या कंपन्या, टेक कंपन्या आणि वित्तीय कंपन्या IPO बाजारात प्रवेश करू शकतात. (Mukesh Ambani Reliance and Tata Sons IPO)

मुकेश अंबानींच्या 2 कंपन्यांचे IPO येण्याची शक्यता

2024 आणि 2025 ही IPO च्या दृष्टीने सर्वात व्यस्त वर्षे असतील. या दोन वर्षांत पाच ते दहा टेक कंपन्या त्यांचे IPO लॉन्च करू शकतात. तसेच, दोन किंवा तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्थानिक कंपन्या आयपीओ बाजारात आणू शकतात.

बँक ऑफ अमेरिकाचे देवाशिष पुरोहित यांच्या मते देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या दोन कंपन्यांचा IPO आणू शकते. यामध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स यांचा समावेश असेल.

Mukesh ambani RIL and rata tata company to launch IPO 2024 year
EPFO: देशात नोकऱ्यांमध्ये झाली वाढ; 15 लाखांहून अधिक सदस्यांचा EPFOमध्ये समावेश, कोणते राज्य आघाडीवर?

याशिवाय आरबीआयने टाटा समूहाला 2025 पूर्वी आपल्या वित्तीय कंपन्यांचे IPO दाखल करणयास सांगितले आहे. एवढेच नाही तर दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर देखील IPO आणण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई मोटरचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल, असा अंदाज आहे.

2024 मध्ये उघडणाऱ्या बहुतेक IPO ला बाजार नियामक SEBI ची मान्यता देखील मिळाली आहे. सेबीने आतापर्यंत कॉर्पोरेट्सना 2024 पर्यंत आयपीओद्वारे 30,000 कोटी रुपये उभारण्याची परवानगी दिली आहे. याअंतर्गत 28 कंपन्या मिळून 30,000 कोटी रुपये उभारणार आहेत. इतर 36 कंपन्यांनी 50,000 कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे पेपर सादर केले आहेत.

Mukesh ambani RIL and rata tata company to launch IPO 2024 year
SEBI: 'झी'चा पाय पुन्हा गोत्यात! कंपनीमध्ये 2,000 कोटींची हेराफेरी; शेअर्समध्ये झाली मोठी घसरण

2024 मध्ये कोणते मोठे IPO येणार

कंपनी                    IPO साइज ( कोटी अंदाजे)
OLA Electric             8300
OYO                  8300
Swiggy                8300
Askash Education        8300
Payu                     5000

गेल्या 3 वर्षात IPOचा ट्रेंड

वर्ष        कंपन्यांचे IPO        IPOचा आकार (कोटी)
2024        64                      1 लाख 
2023        57                      49,434 
2022        40                      59,301 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.