Mukka Proteins IPO : मुक्का प्रोटीन्स लिमिटेडचा आयपीओ खुला होणार...

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड (Mukka Proteins Ltd) या फिश प्रोटीन उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनीचा आयपीओ 29 फेब्रुवारीला खुला होत आहे. यासाठी 26-28 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. अँकर गुंतवणूकदार या 28 फेब्रुवारीला बोली लावू शकतील आणि क्लोजिंग 4 मार्चला होईल. मुक्का प्रोटीन्स लिमिटेडचे शेअर्स 7 मार्चला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होतील.
Mukka Proteins IPO
Mukka Proteins IPOsakal
Updated on

मुक्का प्रोटीन्स लिमिटेड (Mukka Proteins Ltd) या फिश प्रोटीन उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनीचा आयपीओ 29 फेब्रुवारीला खुला होत आहे. यासाठी 26-28 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. अँकर गुंतवणूकदार या 28 फेब्रुवारीला बोली लावू शकतील आणि क्लोजिंग 4 मार्चला होईल. मुक्का प्रोटीन्स लिमिटेडचे शेअर्स 7 मार्चला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होतील. आयपीओमध्ये 224 कोटीचे 8 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील. फेडएक्स सिक्युरिटीज या इश्यूसाठी मर्चंट बँकर आहे, तर कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस हे रजिस्ट्रार आहेत.

आयपीओमधून मिळणाऱ्या 120 कोटीचा वापर कंपनी तिच्या वर्किंग कॅपिटलसाठी करणार आहे. 10 कोटीची रक्कम कंपनी त्यांच्या सहयोगी कंपनी एन्टो प्रोटीन्सच्या वर्किंग कॅपिटलच्या गरजांसाठी वापरणार आहेत. 6 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीजसह कंपनी फिश मील, फिश ऑइल आणि फिश सॉल्यूबल पेस्ट पुरवते. फिश सॉल्यूबल पेस्ट, एक्वा फीड (मासे आणि कोळंबीसाठी), पोल्ट्री फीड (ब्रॉयलर आणि लेयर्ससाठी) आणि पेट फूड (कुत्रा आणि मांजरीचे अन्न) तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहे.फिश ऑइलचा वापर फार्मास्युटिकल उत्पादने, साबण बनवणे, लेदर टॅनरी आणि पेंट उद्योगांमध्येही केला जातो.

भारताव्यतिरिक्त, ते बहरीन, चिली, मलेशिया, फिलीपिन्स, चीन, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, ओमान, तैवान आणि व्हिएतनामसह 10 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 25.8 कोटीचा कंसोलिडेटेड निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या 11.01 कोटीच्या नफ्यापेक्षा खूप जास्त आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये महसूल वाढून 770.5 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी 603.8 कोटी होता. एप्रिल-डिसेंबर 2023 दरम्यान मुक्का प्रोटीन्स लिमिटेडचा निव्वळ नफा 25.6 कोटी आणि महसूल 756.4 कोटी होता.

Mukka Proteins IPO
Bharat Highways Invit IPO : भारत हायवेज इनविटचा आयपीओ खुला, अधिक जाणून घेऊ...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()