Multibagger Stock: 'या' पेनी स्टॉकमध्ये अप्पर सर्कीट, कंपनीला मिळालेल्या ऑर्डर्समुळे शेअर्स तेजीत

Multibagger Stock: गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांनी वाढले आहेत.
Multibagger Stock
Multibagger StockSakal
Updated on

Multibagger Stock: शेअर बाजारात सगळ्यांनाच पैसे कमवायचे असतात. पण योग्य स्टॉक्समध्ये पैसे गुंतवले तरच त्याचा चांगला परतावा मिळतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेक पेनी स्टॉक्सनेही आपल्या गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे.

पण पेनी स्टॉक्समध्ये पैसे गुंतवताना त्याचे फंडामेंटल्स किती मजबूत आहेत याचा विचार झाला पाहिजे. अशात बाजारातील एक्सपर्ट्स आपल्याला मदत करतात. सध्या एका मल्टीबॅगर पेनी स्टॉकवर तज्ज्ञांचा फोकस आहे. एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सने खूप कमी काळात आपल्या गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे.

17 ऑक्टोबरला कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 40.60 रुपयांवर बंद झाले. कंपनीला नुकतीच मध्य रेल्वे हैदराबाद विभागाकडून 3.55 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळेच या शेअरमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करताना दिसत आहेत.

तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत या बॅटरी उत्पादन कंपनीला मध्य रेल्वेकडून आणखी तीन ऑर्डर मिळाल्या आहेत. यामध्ये हैदराबाद विभाग (3.38 कोटी), विजयवाडा (1.5 कोटी) आणि कोटा विभाग (2.7 कोटी) यांचा समावेश आहे.

Multibagger Stock
Share Market Closing: इस्राइल आणि हमासमधील तणावामुळे बाजाराचा मूड खराब, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला

कंपनीला दक्षिण-मध्य रेल्वे झोनच्या हैदराबाद विभागाकडून स्वीकृती पत्र (LoA) प्राप्त झाल्याचे एका फाइलिंगमध्ये एक्सचेंजला सांगितले. ही मंजूरी अमृत भारत स्टेशन योजना (ABSS) अंतर्गत निजामाबाद, कुर्नूल सिटी, मलकपेट, यकतपुरा, हुप्पुगुडा, श्री बालब्रमेश्वर जोगुलांबा स्थानकांवरील मिनिमम एसेंशियल टेलीकॉम सुविधांच्या तरतुदीच्या संदर्भात प्रवाशांंसाठी आहे. या आदेशाची 12 महिन्यांत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

गेल्या एका महिन्यात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स 40 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 235 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 212 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 245 टक्के नफा झाला आहे.

Multibagger Stock
MSP Hike: शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! सरकारने गहू आणि मसूरसह 6 रब्बी पिकांवर वाढवला MSP

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.