Multibagger Penny Stock: 'या' पेनी स्टॉकने 3 वर्षात दिला 260% परतावा, येत्या काळात तेजीचे संकेत

सध्या कंपनीचे शेअर्स 9.98 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal
Updated on

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगल्या स्टॉकच्या शोधात असाल तर तुम्ही टोयाम स्पोर्ट्स (Toyam Sports) शेअर्सचा विचार करु शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे.

टोयाम स्पोर्ट्स ही पब्लिक लिस्टेड कंपनी आहे, जी स्पोर्ट्स प्रॉडक्शन, प्रमोशन आणि मॅनेजमेंटवर फोकस करते.

कंपनीने एमएमएमध्ये 'Kumite-1 लीग' चे आयोजन केले आणि केनिया, मॉरिशस आणि ग्रीसमधील क्रिकेट लीगचे राईट्स मिळवले. सध्या कंपनीचे शेअर्स 9.98 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 561.36 कोटी आहे.

टोयाम स्पोर्ट्स अनेक क्रिकेट इव्हेंट्सच्या सहकार्याने आणि भक्ती वर्ल्ड रेडिओसोबतच्या भागीदारीद्वारे खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करत आहे.

यूएससी वर्ल्डवाइड इव्हेंट्स, टोयामा स्पोर्ट्स लिमिटेड आणि त्याची उपकंपनी पॅसिफिक स्टार स्पोर्ट्स असोसिएटेड कंपनीने मेजर लीग क्रिकेटसह (एमएलसी) लॉन्ग टर्म एसोसिएशनची घोषणा केली.

यूएससी काँप्रिहेन्सिव्ह एलईडी, ग्राउंड प्रॉडक्शन आणि मॅच मॅनेजमेंट सर्व्हिसे देईल, ज्यामुळे ती यूएसए मधील पहिली कंपनी असेल जी यूएसएमधील पहिली कंप्लिट T20 क्रिकेट लीग सोल्यूशन प्रोव्हायडर बनेल.

Share Market Investment Tips
Multibagger Stock: 'या' शेअरमुळे केवळ 7 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसद्वारा (ACE) संचालित आणि यूएसए क्रिकेटद्वारे मंजूर, एमएलसीमध्ये रशीद खान, फाफ डु प्लेसिस आणि किरॉन पोलार्ड यांच्यासह जगभरातील टॉप T20 खेळाडू असतील.

त्याच्या उद्घाटन सिझनमध्ये सहा संघ असतील आणि त्यांच्यामध्ये 18 सामने खेळवले जातील. 30 जुलैला नॉर्थ टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत लीगची समाप्ती होईल.

अलीकडच्या काळात या स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली आहे. टोयाम स्पोर्ट्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 18 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 43 टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, गेल्या 3 वर्षात या शेअरने 260% चा जबरदस्त परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market Investment Tips
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.