Multibagger Stocks: 15 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती! 9 महिन्यांत तिप्पट परतावा; तुमच्याकडे आहे का शेअर?

Multibagger Penny Stocks: शेअर बाजारात असे काही शेअर आहेत जे दीर्घकाळ वाढत नाहीत आणि अचानक दमदार परतावा देतात. असाच एक शेअर ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या गॅब्रिएल इंडियाचा आहे. त्याच्या शेअरनी केवळ 15 वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
Multibagger Penny Stocks gabriel india share price rocketed made crorepati check target price
Multibagger Penny Stocks gabriel india share price rocketed made crorepati check target priceSakal
Updated on

Multibagger Penny Stocks: शेअर बाजारात असे काही शेअर आहेत जे दीर्घकाळ वाढत नाहीत आणि अचानक दमदार परतावा देतात. असाच एक शेअर ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या गॅब्रिएल इंडियाचा आहे. त्याच्या शेअरनी केवळ 15 वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे शेअर्स सुस्त होते परंतु गेल्या वर्षी केवळ 9 महिन्यांत शेअर्सनी 240 टक्क्यांनी झेप घेतली, याचा अर्थ गुंतवणूकदारांचे भांडवल तीन पटीने वाढले. ब्रोकरेज फर्मला अजूनही विश्वास आहे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. सध्या शेअरची BSE वर किंमत 337.05 रुपये आहे (Gabriel India Share Price).

गॅब्रिएल इंडियाने गुंतवणूकदारांना 15 वर्षात करोडपती बनवले

6 मार्च 2009 रोजी गॅब्रिएलचे शेअर्स केवळ 3.34 रुपये किंमतीत उपलब्ध होते. आता ते 337.05 रुपयांवर आहेत, म्हणजे केवळ 15 वर्षांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपयांवर पोहचली आहे. शेअरने केवळ दीर्घ मुदतीत जोरदार परतावा दिला आहे परंतु अल्पावधीत चांगली कमाई देखील केली आहे.

Multibagger Penny Stocks gabriel india share price rocketed made crorepati check target price
Richest Indians: भारतात अब्जाधीशांची संख्या चीन, ब्रिटन आणि युरोपपेक्षाही जास्त; काय आहे कारण?

गेल्या वर्षी 28 मार्च 2023 रोजी तो 129.50 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या पातळीपासून, तो केवळ 9 महिन्यांत जवळजवळ 240 टक्क्यांनी वाढला आहे आणि 6 डिसेंबर 2023 रोजी 440 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

गॅब्रिएल इंडिया ही ऑटो पार्ट्स उद्योगातील मोठी कंपनी आहे. आनंद ग्रुपची ही कंपनी शॉक एब्जॉर्बर्स, स्ट्रट्स आणि फ्रंट फोर्क्स बनवते. कंपनीची उत्पादने प्रवासी कार, व्यावसायिक वाहने आणि दुचाकी वाहनांमध्ये वापरली जातात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअर खानने 433 रुपयांच्या लक्ष्य किंमतीवर खरेदी रेटिंग कायम ठेवली आहे.

Multibagger Penny Stocks gabriel india share price rocketed made crorepati check target price
RBI Rules: होळी खेळताना नोटांवर रंग लागलाय? रंगाच्या नोटांबाबत काय आहे RBIचा नियम?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.