Multibagger Stock: शेअर बाजारात कोणता शेअर नफा मिळवून देईल काही सांगता येत नाही. अशात बोंडाडा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या (Bondada Engineering) शेअर्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शेअरमध्ये केवळ गेल्या तीन दिवसांत 33 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
गेल्या शुक्रवारी, या शेअरमध्ये 10 टक्क्यांचे अपर सर्किट होते आणि तो 366.40 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीला तीन कंपन्यांकडून एकूण 406.64 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळेच सध्या या शेअरमध्ये तेजी आली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 791 कोटी आहे.
बोंडाडा इंजिनिअरिंगला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेल या तीन कंपन्यांकडून एकूण 406.64 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
फायलिंगनुसार, बोंदाडा इंजिनिअरिंगला भारती एअरटेलकडून 1.37 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय, गेल्या 2 दिवसात कंपनीला 405.27 कोटी रुपयांच्या 2 ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यामध्ये भारत संचारकडून 381 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे. तर दुसरी ऑर्डर BHEL कडून 24.27 कोटीची आहे.
गेल्या एका महिन्यात बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सने 106 टक्क्यांचा उत्कृष्ट परतावा दिला आहे. त्याच वेळी, त्याच्या गुंतवणूकदारांनी गेल्या 6 महिन्यांत 145 टक्के नफा कमावला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचेॉ 2.44 लाख झाले असते.
कंपनीचा महसूल 10.92 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 370.59 कोटीवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये 334.11 कोटी होता. तसेच, नफा 10.14 कोटीवरून 17.85 कोटीपर्यंत वाढला आहे.
बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड टेलीकॉम, सोलर एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना इंजिनिअरिंग, प्रोक्योअरमेंट आणि कंस्ट्रक्शन ऑपरेशन शिवा मेन्टेनन्स सर्व्हिसेस देते.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.