Multibagger Stock: फक्त 50 हजारांत गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, 10 वर्षात कंपनीने दिला जबरदस्त परतावा

Multibagger Stock: बीएसईवर या शेअरची किंमत 663.35 रुपये आहे.
Multibagger Stock Dynacons Systems and Solutions Limited share has given 26000 percent return in 10 years
Multibagger Stock Dynacons Systems and Solutions Limited share has given 26000 percent return in 10 years Sakal
Updated on

Multibagger Stock: शेअर बाजारात अनेक शेअर्स आहेत जे बरेचदा फोकसमध्ये नसतात, पण दमदार परतावा देतात. असाच एक स्टॉक म्हणजे डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड (Dynacons Systems and Solutions Limited). या आयटी कंपनीच्या शेअरने 10 वर्षात 26,000 टक्के परतावा दिला असून गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

बीएसईवर उपलब्ध डेटानुसार डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 1 नोव्हेंबर 2013 रोजी 2.66 रुपये होती. तर 1 नोव्हेंबर 2023 रोजी ही किंमत 694.45 रुपये होती. अशा प्रकारे गेल्या 10 वर्षात स्टॉकमध्ये 26000 टक्के वाढ झाली आहे.

अशा स्थितीत या शेअरमध्ये 10 वर्षांपूर्वी कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 2.61 कोटीपर्यंत वाढली असती. जर एखाद्याने 50 हजारांची गुंतवणूक केली असती तर त्याचे आज 1.30 कोटी झाले असते.

डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडचा स्टॉक गेल्या एका वर्षात सुमारे 145 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांत 70 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी बीएसईवर हा स्टॉक 663.35 रुपयांवर बंद झाला.

Multibagger Stock Dynacons Systems and Solutions Limited share has given 26000 percent return in 10 years
Arvind Kejriwal: दिल्ली सरकारची दिवाळी भेट! मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर केला तब्बल 'इतक्या' हजारांचा बोनस

ही कंपनी 1995 मध्ये सुरू झाली. डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड एंड-टू-एंड टेक्नोलॉजी आणि टेक्नोलॉजीशी संबंधित सर्व्हिसेस देते. कंपनी मोठ्या नेटवर्कचे टर्नकी सिस्टम इंटिग्रेशन, इन्फ्रास्ट्रक्चर डिझाइनसह डेटा सेंटर इंफ्रास्ट्रक्चरसारख्या आयटीसंबंधित सर्व्हिसेस देते.

Multibagger Stock Dynacons Systems and Solutions Limited share has given 26000 percent return in 10 years
Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा भाव

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.