Multibagger Stock: 10 रुपये किंमत असणाऱ्या पेनी स्टॉकची कमाल, LIC ने 48 खरेदी केले लाख शेअर्स

Multibagger Stock: कंपनीचे मार्केट कॅप 260 कोटी रुपये आहे.
Multibagger Stock
Multibagger StockSakal
Updated on

Multibagger Stock: स्मॉलकॅप कंपनी इंटेग्रा इसेन्शिया (Integra Essentia) हा शेअर मागच्या वर्षभरापासून तसा स्थिर आहेत, पण तरीही हा शेअर मल्टीबॅगर्सच्या यादीत सामिल आहे. हा एक पेनी मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे.

कोरोना नंतरच्या काळात, हा स्मॉलकॅप पेनी स्टॉक 0.39 रुपयांवरून 5.60 रुपयांवर गेला. म्हणजेच या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षांत 1,350% परतावा दिला आहे. यामुळेच भारतीय आयुर्विमा महामंडळसारख्या (LIC) गुंतवणूकदारांनीही या पेनी स्टॉकवर विश्वास ठेवला आहे.

या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीने एप्रिल ते जून या तिमाहीत या कंपनीतील आपली गुंतवणूक कायम ठेवली. या कंपनीचे मार्केट कॅप 260 कोटी रुपये आहे.

इंटेग्रा इसेन्शियाच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत एलआयसीकडे कंपनीचे 48,59,916 शेअर्स आहेत म्हणजेच जवळपास 1.06% हिस्सा आहे.

जर आपण जानेवारी-मार्च 2023 दरम्यान स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली, तर कंपनीकडे एवढाच 1.06% हिस्सा होता.

या वर्षी आतापर्यंत कंपनीचा स्टॉक 6.85 रुपयांवरून 5.60 रुपयांवर खाली घसरला आहे, म्हणजेच 2023 मध्ये कंपनीचा शेअर 20% घसरला आहे.

Multibagger Stock
Multibagger Stock: 19 रुपयांच्या शेअरने केले मालामाल! आता कंपनी देणार 1 शेअरमागे 100 रुपयांचा डिव्हिडेंड

गेल्या एका वर्षात या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये 5% घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांत हा स्टॉक 0.39 पैशांवरून 5.60 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे लाँग टर्म गुंतवणूकदारांना 1,350% परतावा मिळाला आहे.

स्मॉलकॅप कंपनीने 2024 च्या पहिल्या तिमाहीत 56.40 कोटी उत्पन्न राहिले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 55.96 कोटी होते.

जून 2023 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 200% ने वाढून 18.39 कोटी झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 58.32 लाख होता.

Multibagger Stock
Jagsonpal Pharmaceuticals : जगसनपाल फार्मास्युटिकल्स

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.