Multibagger Stocks: डिसेंबर महिन्याचे आता अगदी 2 दिवस उरलेत. या संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा पाहिला तर काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला तर काहींनी गुंतवणूकदारांचे नुकसान केले.
अशात आर्थिक सेवा पुरवणाऱ्या इंटेलीवेट कॅपिटल वेंचर्सने (Intellivate Capital Ventures) यावर्षी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 10 पटींनी वाढ केली आहे, म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक 10 लाख झाली.
जागतिक चलनवाढीचा विक्रमी दर, इस्रायल-हमास युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीसारखी परिस्थिती असूनही या शेअरमधील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या खिशात भर पडली. बीएसईवर हा शेअर सध्या 122.11 रुपयांवर ट्रेड करतोय.
इंटेलिव्हेट कॅपिटल व्हेंचर्सचे शेअर्स या वर्षी 2 जानेवारीला 11.63 रुपयांपासून सुरू झाले आणि आता तो 122.11 रुपयांवर पोहोचला आहे, याचा अर्थ या वर्षी गुंतवणूकदारांना त्याने 950 टक्के परतावा दिला आहे. केवळ या महिन्याचा विचार केल्यास हा शेअर 35 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे.
आयटी, मीडिया अँड एंटरटेन्मेंट, फायनांन्शियल सर्व्हिसेज, इन्फ्रा, कंस्ट्रक्शन सर्व्हिसेज, रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक्स इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांना त्यांनी निधी दिला आहे.
कंपनीच्या आर्थिक आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीत तिचा नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर 1 लाख वरून 9 लाख इतका वाढला आहे.
जून तिमाहीत कंपनीने 1.40 कोटीचा निव्वळ नफा कमावला होता. त्याचा महसूल सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत वार्षिक आधारावर 20 लाख रुपयांवरून 13 लाख रुपयांवर घसरला. जूनच्या तिमाहीतही त्याचा महसूल 13 लाख रुपये होता.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.