Multibagger Stock: 4 वर्षात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 पटीने वाढ; कोणता आहे हा स्टॉक?

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्सने गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. अशात ओबेरॉय रियल्टीचे शेअर्सही (Oberoi Realty) मल्टीबॅगर शेअर्सच्या लिस्टमध्ये आहेत. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा दिला आहे.
Multibagger Stock Oberoi Realty share price money increased more than 4 times in 4 years
Multibagger Stock Oberoi Realty share price money increased more than 4 times in 4 years Sakal
Updated on

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्सने गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. अशात ओबेरॉय रियल्टीचे शेअर्सही (Oberoi Realty) मल्टीबॅगर शेअर्सच्या लिस्टमध्ये आहेत. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा दिला आहे.

मुंबईस्थित रिअल इस्टेट कंपनीच्या शेअर्समध्ये नुकतीच 8.87 टक्क्यांची मोठी घसरण झाली. हा शेअर सध्या 1370.50 वर ट्रेड करत आहे. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 49,831.69 कोटीवर घसरले आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,586.15 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 790.05 रुपये आहे.

ओबेरॉय रियल्टीने नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 49 टक्क्यांनी घट झाली आहे. या कालावधीत नफा 360 कोटी होता, जो एका वर्षापूर्वी 702.57 कोटी होता.

Multibagger Stock Oberoi Realty share price money increased more than 4 times in 4 years
Budget 2024: अर्थसंकल्पात करदात्यांना मिळू शकतो दिलासा; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

कमकुवत टॉपलाइन आणि ऑपरेटिंग आकड्यांमुळे नफ्यातही घट झाली आहे. तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक तुलनेत 35.3 टक्क्यांनी घसरून 1,054 कोटीवर आला आहे. ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने प्रति शेअर 1180 रुपयांच्या टारगेटसह आपला 'अंडरवेट' कॉल कायम ठेवला.

गेल्या 6 महिन्यांत ओबेरॉय रियल्टीचे शेअर्स 28 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका वर्षात 65 टक्के परतावा दिला आहे. गेल्या चार वर्षांत स्टॉकमध्ये 365 टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे.

Multibagger Stock Oberoi Realty share price money increased more than 4 times in 4 years
Stock Market Crash: शेअर बाजारात त्सुनामी! गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान

मे 2020 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे 293.30 रुपये होती, जी आज 1370.50 रुपये झाली आहे. याचाच अर्थ या काळात गुंतवणूकदारांचे पैसे साडेचार पटीने वाढले आहेत. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची संपत्ती सुमारे 4 लाख 50 हजार इतकी झाली असती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.