Multibagger Stock: फॅन-वायर बनवणाऱ्या कंपनीमुळे गुंतवणूकदार मालामाल! आणखी वाढीचा तज्ज्ञांना विश्वास

सध्या हे शेअर्स बीएसईवर 4.39 टक्क्यांच्या वाढीसह 4,309.30 रुपयांवर पोहोचले आहेत.
Polycab Multibagger Stock
Polycab Multibagger StockSakal
Updated on

Multibagger Stock: पॉलीकॅब (Polycab) या पंखे, केबल्स, वायर्स, बल्ब आणि स्विचसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. या शेअर्सने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात 6 पटीने वाढ केली आहे.

नुकतेच कंपनीचे जून तिमाहीचे निकाल लागले. या निकालांच्या आधारे, त्याच्या शेअर्सने त्याने विक्रमी उच्चांक गाठला. ब्रोकरेज देखील जूनच्या निकालांवर पॉझिटीव्ह आहेत आाणि त्यामुळेच त्यांनी या शेअर्सवरील आपले होल्ड रेटिंग कायम ठेवले आहे.

सध्या हे शेअर्स बीएसईवर 4.39 टक्क्यांच्या वाढीसह 4309.30 रुपयांवर पोहोचले आहेत. या शेअरमध्ये येत्या काळात आणखी तेजी येईल असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

जून तिमाही कंपनीसाठी चांगली ठरली. इंफ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि कॅपेक्स सायकलमध्ये रिकव्हरी झाल्यामुळे इंस्टिट्यूशनल डिमांड मजबूत राहिली.

निर्यातीतही 88 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय कंपनीने डिस्ट्रीब्यूशमध्येही बरेच बदल केले. त्यामुळेच पॉलीकॅबच्या महसुलात वार्षिक 42.1 टक्के वाढ झाली आहे आणि जून तिमाहीत निव्वळ नफ्यात 80 टक्के वाढ झाली आहे.

Polycab Multibagger Stock
Johnson And Johnson: 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला कोर्टाने ठोठावला 154 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

बी2बी सेक्टरमधून मजबूत मागणी आणि कमोडिटीच्या घसरत्या किमती यामुळे त्याची कमाई आर्थिक वर्ष 2023-2025 मध्ये वार्षिक 24.3 टक्के सीएजीआरने वाढण्याची शक्यता असल्याचे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे.

याशिवाय, एप्रिल-सप्टेंबर 2023 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एफएमईजी अर्थात फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिक गुड्समध्ये रिकव्हरीचे संकेत आहेत. त्यामुळेच ब्रोकरेज फर्मने 4,100 रुपयांच्या टारगेटसह आपले होल्ड रेटिंग कायम ठेवले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Polycab Multibagger Stock
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.