Multibagger stock: 3 वर्षात झाली 15 पट वाढ, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger stock : मल्टीबॅगर शेअर्समध्ये गुंतवणूक करुन अनेक गुंतवणुकदार मालामाल झालेत. तुम्ही अशाच स्टॉक्सच्या शोधत असाल तर Praveg Ltd च्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे.
Multibagger stock Praveg Ltd share 15 times increase in 3 years
Multibagger stock Praveg Ltd share 15 times increase in 3 years Sakal
Updated on

Multibagger stock : मल्टीबॅगर शेअर्समध्ये गुंतवणूक करुन अनेक गुंतवणुकदार मालामाल झालेत. तुम्ही अशाच स्टॉक्सच्या शोधत असाल तर Praveg Ltd च्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे.

सध्या हा शेअर 660.10 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 1,486.29 कोटी झाले आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 724.50 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 223 रुपये आहे.

या मल्टीबॅगर स्टॉकला लक्षद्वीपच्या पर्यटन विभागाकडून वर्क ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत, कंपनीला लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील अगाट्टी बेटावर रेस्टॉरंट, क्लोकरूम, चेंजिंग रूम आणि इतर सुविधांसह किमान 50 टेंट्सचे डेव्हलपमेंट, ऑपरेशन, मेंटेनन्स आणि मॅनेजमेंटचे काम मिळाले आहे.

Multibagger stock Praveg Ltd share 15 times increase in 3 years
Share Market : शेअर बाजाराचा ‘जीव’ ट्रक इंडस्ट्री!

Praveg Ltd चे शेअर्स गेल्या 6 महिन्यात 36 टक्क्यांनी वाढले आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सने 134 टक्के इतका चांगला नफा कमावला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 184 टक्के परतावा मिळाला आहे.

त्याच वेळी, गेल्या तीन वर्षांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1381 टक्के नफा मिळवून दिला आहे. तीन वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात 15 पट वाढ झाली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 44.55 रुपये होती, जी आज 660.10 रुपयांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 15 पट वाढ झाली आहे.

Multibagger stock Praveg Ltd share 15 times increase in 3 years
ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअरमध्ये झाली जबरदस्त वाढ, यावर्षी आतापर्यंत 250 टक्के परतावा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.