Multibagger Stock: साधना नायट्रो केमचे शेअर्स (Sadhana Nitro Chem) सध्या फोकसमध्ये आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये हे शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर होते. पण सध्या या उच्चांकावरून ते 23 टक्के खाली आले आहेत. पण या शेअरने लाँग टर्ममध्ये आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.
कोरोना महामारीनंतर त्यांचा व्यवसाय मंदावला आणि तो अजूनही प्री-कोविड बिझनेस लेव्हलला स्पर्श करू शकलेला नाही. पण येत्या काळात हा शेअर दमदार परफॉर्म करेल असा विश्वास ब्रोकरेज व्हेंच्युराने वर्तवला आहे. त्यामुळेच त्यांनी या शेअरवर बाय रेटिंगसह आपले कव्हरेज सुरू केले आहे. सध्या हे शेअर्स 93.52 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
साधना नायट्रो केमच्या शेअर्सची किंमत 22 जानेवारी 2016 रोजी फक्त 84 पैसे होती. आता ते 93.52 रुपयांवर आहे, म्हणजे अवघ्या 8 वर्षांत 1 लाखाचे 1.11 कोटी झालेत. गेल्या वर्षी 6 जून 2023 रोजी हा शेअर एका वर्षाच्या उच्चांकावर होता.
यानंतर, केवळ 2 महिन्यांत तो सुमारे 46 टक्क्यांनी घसरला आणि 25 ऑगस्ट 2023 रोजी 66 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला. या पातळीपासून सुमारे 42 टक्के रिकव्हरी झाली आहे पण एका वर्षाच्या उच्चांकापासून तो अद्याप 23 टक्के सवलतीवर मिळत आहे.
साधना नायट्रो केम ही देशातील नायट्रोबेन्झिन उत्पादन करणार्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे आणि ODB2 (कलरफॉर्मर) उत्पादन करणारी एकमेव देशांतर्गत कंपनी आहे.
नुकतीच, नायट्रोबेन्झिनपासून पॅरा अमिनो फिनॉल (पीएपी) बनवण्यासाठी पीएलआय योजनेचे वाटप करण्यात आले आहे आणि त्याद्वारे साधना नायट्रो केम ही मल्लिनक्रोड फार्मा नंतर जगातील दुसरी कंपनी बनणार आहे.
अलीकडेच, कंपनीने स्वतःच्या वापरासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पीएपीच्या उत्पादनासाठी राईट्स इश्यूद्वारे 49.95 कोटी उभारण्याची घोषणा केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून ब्रोकरेजने 148 रुपयांच्या टारगेटवर बाय रेटिंग दिले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.