Multibagger Stock: 3 वर्षात 1 लाखाचे झाले 9 लाख, तुमच्याकडे आहे का हा मल्टीबॅगर स्टॉक?

Multibagger Stock: कंपनीचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 18 टक्क्यांनी वाढले आहेत.
Multibagger Stocks
Multibagger StocksSakal
Updated on

Multibagger Stock: शेअर बाजारात चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून बरेच लोक कोट्यधीश होतात. पण त्यासाठी लाँग टर्म थांबण्याची तयारी असणे गरजेचे आहे. लाँग टर्मसाठी थांबायचे नसेल तर मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही कमी कालावधीत दमदार नफा कमवू शकता.

मात्र, अशा शेअर्समध्ये धोकाही जास्त असतो. पण रिस्क घेतली तर नफाही तेवढाच छप्परफाड असतो हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. असाच एक स्टॉक सफारी इंडस्ट्रीज इंडिया (Safari Industries India) आहे.

सफारी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड लगेज बॅग आणि ऍक्सेसरीजच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमधील बडोदाजवळील हलोल इथल्या प्लांटमध्ये लगेज बॅग्स तयार केल्या जातात.

या शेअरने केवळ 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 9 पटीहून अधिक परतावा दिला आहे. नुकताच हा स्टॉक 1.21 टक्क्यांनी घसरत 3590.35 वर बंद झाला आहे.

सफारी इंडस्ट्रीज इंडियाचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 18 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 82 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.

या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 111 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या गुंतवणूकदारांना 135 टक्के परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत 860 टक्के बंपर नफा झाला आहे.

Multibagger Stocks
LIC ची सुपरहिट योजना! सरकारी नोकरी नसली तरी दरमहा मिळणार 16 हजार पेन्शन, अशी करा गुंतवणूक

ऑगस्ट 2020 रोजी सफारी इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 372 रुपये होती, जी आज 3590.35 रुपये झाली आहे. याचा अर्थ या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशात 9 पट वाढ झाली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची रक्कम आज 9 लाख रुपये झाली असती. या कालावधीत शेअरने 860 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.

Multibagger Stocks
Bank Fraud Case: वरुण इंडस्ट्रीजवर FIR दाखल, दोन बँकांची 388 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कंपनीवर आरोप

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.