Multibagger Stock: अदानी टोटल एनर्जीसोबत कंपनीचा ईव्ही चार्जरसाठी करार, 'हा' शेअर करेल मालामाल

Servotech Power: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या (Servotech Power Systems) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. ईव्ही चार्जर्स बनवणारी ही देशातील आघाडीची कंपनी आहे.
Multibagger Stock Servotech Power Systems ev company signs contract with adani total energies ev chargers
Multibagger Stock Servotech Power Systems ev company signs contract with adani total energies ev chargers Sakal
Updated on

Servotech Power: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या (Servotech Power Systems) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. ईव्ही चार्जर्स बनवणारी ही देशातील आघाडीची कंपनी आहे.

कंपनीचे शेअर्स सध्या 97.25 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीने अलीकडेच अदानी टोटल एनर्जीसोबत करार केला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 108.70 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 16.48 रुपये आहे.

सर्व्होटेकने अदानी टोटल एनर्जीसोबत विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणी एसी चार्जर पुरवण्यासाठी करार केला आहे. या करारांतर्गत कंपनी ईव्ही चार्जर्स तयार करुन सप्लाय आणि इन्स्टॉलेशन (Supply and Install) करेल. 2030 पर्यंत 75,000 स्टेशन्स उभारण्याच्या अदानी टोटल गॅसच्या योजनेचा हा एक भाग आहे. (Multibagger Stock Servotech Power Systems ev company signs contract with adani total energies ev chargers)

यापूर्वी, सर्वोटेक पॉवर सिस्टम्सला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (BPCL) 1800 डीसी फास्ट ईव्ही चार्जरची मोठी ऑर्डर मिळाली होती. या 120 कोटीच्या प्रकल्पामध्ये बीपीसीएल ई-ड्राइव्ह प्रकल्पाचा भाग म्हणून देशभरातील 1800 ईव्ही चार्जर्सचे उत्पादन, पुरवठा, इंस्टॉलिंगचा समावेश आहे.

Multibagger Stock Servotech Power Systems ev company signs contract with adani total energies ev chargers
Nirmala Sitharaman: "...म्हणून अर्थव्यवस्था गंभीर संकटात"; निर्मला सीतारामन यांच्या श्वेतपत्रिकेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

कंपनीला याआधी बीपीसीएलच्या ई-ड्राइव्ह प्रकल्पासाठी देशभरात अनेक ठिकाणी 2649 एसी ईव्ही चार्जर पुरवठा आणि इंस्टॉल करण्याची ऑर्डरही मिळली. सर्व्होटेकने सप्लाय आणि इंस्टॉलेशनचे 36 टक्के काम पूर्ण केले आहे आणि संपूर्ण प्रकल्प मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल.

सर्व्होटेक पॉवर सिस्टीमचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 22 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 24 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात, त्याच्या गुंतवणूकदारांना 343.46 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत हा शेअर 760 टक्क्यांनी वाढला आहे. एवढेच नाही तर सप्टेंबर 2021 पासून आतापर्यंत 3,760 टक्के परतावा दिला आहे.

Multibagger Stock Servotech Power Systems ev company signs contract with adani total energies ev chargers
Paytm: पेटीएमने बदलले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे नाव; काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.