Multibagger Stock: 10 हजाराचे झाले 21 लाख, 'या' शेअरने 3 वर्षात दिला जबरदस्त परतावा

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन प्रत्येकालाच पैसे कमवायचे असतात. चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होण्याचा प्रयत्न नवा नाही. बरेच लोक यामध्ये यशस्वी होतात, पण काहींना नुकसानही होते.
Multibagger Stock SG Finserve Ltd share has given more than 21200 percent return in three year
Multibagger Stock SG Finserve Ltd share has given more than 21200 percent return in three year Sakal
Updated on

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन प्रत्येकालाच पैसे कमवायचे असतात. चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होण्याचा प्रयत्न नवा नाही. बरेच लोक यामध्ये यशस्वी होतात, पण काहींना नुकसानही होते. कारण कोणता स्टॉक नफा मिळवून देईल आणि नेहमी हिरव्या रंगात राहील हे अचूकपणे सांगणे अशक्य आहे.

काहीवेळा मजबूत परताव्याची क्षमता असलेला स्टॉक फ्लॉप होऊ शकतो आणि फ्लॉप वाटणारा शेअरही चांगला परफॉर्म करतो. असाच एक शेअर आहे एसजी फिनसर्व्ह लिमिटेडचा (SG Finserve Ltd) आहे. 3 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत पाहता, कोणीही हा शेअर चांगला परतावा देऊ शकेल असे सांगू शकत नव्हता. पण गेल्या 3 वर्षात या शेअरने 21200 टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे.

एसजी फिनसर्व्ह लिमिटेडच्या शेअरची किंमत 3 वर्षांपूर्वी 22 डिसेंबर 2020 रोजी बीएसईवर(BSE) फक्त 2.3 रुपये प्रति शेअर होती. पण 22 डिसेंबर 2023 रोजी शेअरची किंमत 490 रुपयांवर बंद झाली.

म्हणजेच, गेल्या 3 वर्षांत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 21200 टक्क्यांहून अधिक बंपर परतावा दिला आहे. जर एखाद्याने 3 वर्षांपूर्वी एसजी फिनसर्व्ह लिमिटेडच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आज 21.30 लाखापेक्षा जास्त झाली असती.

एसजी फिनसर्व्ह पूर्वी मुंगीपा सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जायची. कंपनी जुलै 2015 मध्ये स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली. कंपनीला 2019 मध्ये एनबीएफसी म्हणून काम करण्यासाठी आरबीआयकडून परवाना मिळाला.

Multibagger Stock SG Finserve Ltd share has given more than 21200 percent return in three year
Tata Steel: टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येणार; ब्रोकरेज कंपन्यांना विश्वास

बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप सध्या 2692.50 कोटी आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर 2023 च्या अखेरीस यातील प्रवमोटर्सचा हिस्सा 47.80 टक्के होता आणि लोकांचा हिस्सा 52.20 टक्के होता.

Multibagger Stock SG Finserve Ltd share has given more than 21200 percent return in three year
Small Cap Stock: स्मॉलकॅप पॉवर सेक्टरचा 'हा' शेअर देईल जबरदस्त परतावा, कसा ते जाणून घ्या

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.