Multibagger Stock: सोनाटा सॉफ्टवेअरचे (Sonata Software) शेअर्स मल्टीबॅगर शेअर्समध्ये गणले जातात. कारण हे असे शेअर्स आहेत जे कधीही खरेदी केले तरी त्यातून गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा मिळत आला आहे. हा स्टॉक केवळ लाँग टर्म नाही तर शॉर्ट टर्ममध्येही किंग ठरला आहे.
त्याने 11 महिन्यांत 190 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे आणि 11 वर्षांत केवळ 88 हजारांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
10 ऑगस्ट 2012 रोजी सोनाटा सॉफ्टवेअरचे शेअर्स अवघ्या 6.49 रुपयांना होते. आता ते 739.55 रुपयांवर आहेत. म्हणजेच 11 वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअरने 88 हजारांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 1 कोटीत केले.
गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास 2 जानेवारी 2023 रोजी तो 276.88 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता आणि त्यानंतर 11 महिन्यांत तो 190 टक्क्यांहून अधिक वाढला 14 डिसेंबर 2023 रोजी 803.55 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
यानंतर, प्रॉफिट बुकींगमुळे किंमत नरमली आणि सध्या या उच्चांकावरून सुमारे 8 टक्के सवलतीवर मिळत आहे.
आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2026 दरम्यान, कंपनीचा महसूल 23 टक्के चक्रवाढ दराने वाढेल आणि निव्वळ नफा 24 टक्के चक्रवाढ दराने वाढेल असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. याशिवाय मोठ्या डिल्स, टियर-1 हायर आणि पार्टनरशिपमुळे वातावरण पॉझिटीव्ह आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून, ब्रोकरेज आयडीबीआय कॅपिटलने या शेअर्समध्ये बाय रेटिंग शिवाय 915 रुपयांच्या टारगेटसह त्याचे कव्हरेज सुरू केले आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.