Multibagger Stock: 4 वर्षात 1 लाखाचे झाले 58 लाख, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का 'हा' शेअर?

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये चांगले फंडामेंटल्स असणारे शेअर्स तुम्हाला दमदार परतावा देतात. त्यामुळेच एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना त्याचे फंडामेंटल्स तपासून मग गुंतवणूक करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Multibagger stock Suraj Products share turns 1 lakh to 55 lakh in four years
Multibagger stock Suraj Products share turns 1 lakh to 55 lakh in four years Sakal
Updated on

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये चांगले फंडामेंटल्स असणारे शेअर्स तुम्हाला दमदार परतावा देतात. त्यामुळेच एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना त्याचे फंडामेंटल्स तपासून मग गुंतवणूक करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्हीही अशाच चांगल्या स्टॉक्सच्या शोधात असाल तर तुम्ही सूरज प्रॉडक्ट्सच्या (Suraj Products) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.

त्याने अतिश कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांसाठी बंपर नफा कमावला आहे. सध्या हा शेअर 444.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचे मार्केट कॅप 506.62 कोटी आहे.

गेल्या एका महिन्यात सूरज प्रॉडक्ट्सचे शेअर्स जवळपास 9 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 97 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 222 टक्के परतावा मिळाला आहे. एवढेच नाही तर कंपनीने गेल्या 4 वर्षांत सुमारे 1300 टक्के आणि गेल्या 5 वर्षांत 2144 टक्के नफा कमावला आहे.

Multibagger stock Suraj Products share turns 1 lakh to 55 lakh in four years
Paytm: पेटीएम ॲपचे काय होणार? बंद होणार का? RBIच्या कारवाईनंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

जून 2020 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 7.66 रुपये होती, जी वाढून 444.40 रुपये झाली आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशात 58 पट वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 58 लाख झाले असते.

Multibagger stock Suraj Products share turns 1 lakh to 55 lakh in four years
Paytmवर कारवाई केल्याप्रकरणी PM मोदी अन् RBIला भारतीय स्टार्टअप्सच्या मालकांचं पत्र! काय आहे म्हणणं?

सूरज प्रॉडक्ट्स लिमिटेड ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात स्पंज आयर्न आणि पिग आयर्नचे उत्पादन करते. कंपनीकडे 36,000 एमटीपीए स्पंज आयर्न, 24,000 एमटीपीए पिग आयर्न, 72,600 एमटीपीए बिलेट्स आणि 72,600 एमटीपीए टीएमटी बार्सची क्षमता असलेली वर्टिकली इंटीग्रेटेड कंटिन्यू-कास्टिंग स्टील मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()