Multibagger Stock: टेक्नोग्रीन सॉल्यूशंसने (Techknowgreen Solutions Ltd) अवघ्या 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत श्रीमंत केले आहे. गेल्या 3 महिन्यांत शेअर्सची किंमत 3 पटीने वाढली आहे.
विशेष बाब म्हणजे कंपनीचे शेअर्स फक्त 3 महिन्यांपूर्वीच शेअर बाजारात लिस्ट झाले होते. त्याची लिस्टिंग झाल्यापासून शेअर्स सातत्याने वाढत आहेत. टेक्नोग्रीन सोल्युशन्स लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी बीएसवर 298 रुपयांवर ट्रेड करत होते.
टेक्नोग्रीन सोल्युशन्सचा आयपीओ याच वर्षी सप्टेंबरमध्ये आला होता आणि कंपनीचे शेअर्स 27 सप्टेंबर रोजी 91.35 रुपयांवर लिस्ट झाले होते. तेव्हापासून त्याची किंमत 226% वाढून 298 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने आयपीओवेळी टेक्नोग्रीन सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्या 1 लाखाचे 3.26 लाख झाले असते.
कंपनीला नवी मुंबईस्थित ड्युएट इंडिया हॉटेल्सकडून सुमारे 18 कोटींच्या ऑर्डर मिळाल्याचे टेक्नोग्रीन सोल्युशन्सने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत सांगितले.
याआधी, 22 नोव्हेंबरला स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया आणि सिप्ला यांच्याकडून 2 ऑर्डर मिळाल्याचे सांगितले होते. या दोन ऑर्डरची किंमत सुमारे 3.40 कोटी असल्याचे कंपनीने सांगितले.
टेक्नोग्रीन सोल्युशन्स ही एक मायक्रोकॅप कंपनी आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू सध्या 222.37 कोटी आहे. त्याने बीएसईच्या एसएमई मार्गाने आपला आयपीओ लॉन्च केला. कंपनीचा 16.72 कोटीचा आयपीओ 12 वेळा सबस्क्राइब झाला. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स आणि कंप्लायन्स सोल्यूशन्सद्वारे पर्यावरणीय आयटी सोल्यूशन्स प्रदान करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.