Multibagger Stock: गुंतवणूकदार झाले मालामाल! रेल्वे कंपनीच्या शेअरने पकडला बुलेट ट्रेनचा वेग

Multibagger Stock: कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर आहेत
Multibagger Stock
Multibagger StockSakal
Updated on

Multibagger Stock: टेक्समॅको रेल अँड इंजिनीअरिंग (Texmaco Rail Engineering) या रेल्‍वेशी संबंधित कंपनीचे शेअर्स सध्या चांगल्या तेजीत दिसत आहेत. सोमवारी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसली. त्यामुळे हा स्टॉक विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

टेक्समॅको रेलच्या शेअर्सने इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये 14 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आणि तो 149.40 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. यानंतर, प्रॉफिट-बुकिंगमुळे किंमतीत थोडी घसरण झाली पण तरीही तो मजबूत स्थितीत आहे. त्याचे शेअर्स सोमवारी 12.74 टक्क्यांनी वाढून 147.75 रुपयांवर बंद झाले.

Multibagger Stock
Reliance AGM 2023: AI मॉडेल ते जिओ एअर फायबर... मुकेश अंबानींच्या १० मोठ्या घोषणा! भारताला 'असा' होणार फायदा

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने आदित्य बिर्ला समूहाच्या हिंदाल्को इंडस्ट्रीजशी करार केला. या अंतर्गत ते ऍल्युमिनियम रेल्वे वॅगन्स आणि कोच बनवणार आहे. त्यामुळे शेअर खरेदीला सपोर्ट मिळाला.

या महिन्यात हे शेअर्स आतापर्यंत सुमारे 37 टक्क्यांनी वाढले आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षात 252 टक्क्यांनी वाढलेत. त्यांच्या व्यवसायाला भारतीय रेल्वेच्या 'मिशन 3000 एमटी'कडूनही चांगला सपोर्ट मिळत आहे. याअंतर्गत 2027 पर्यंत मालवाहतूक क्षमता दुप्पट करून 300 कोटी टन करण्याचे लक्ष्य आहे.

टेक्समॅको रेल आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या रेल्वे आणि रेल्वेशी संबंधित प्रॉडक्ट्स तयार करतात. ट्रॅकचे काम, रेल्वे सिग्नलिंग, टेलिकॉम आणि मेट्रो ट्रॅकच्या कामात ही कंपनी पारंगत आहे.

Multibagger Stock
Reliance AGM 2023: : रिलायन्स इंडस्ट्रीज ने दहा वर्षात दीडशे अब्ज डॉलर गुंतवले

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, एप्रिल-जून 2023 मध्ये त्यांना 14.57 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत 22.53 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न 298.70 कोटी रुपयांवरून 656.82 कोटी रुपयांपर्यंत दुप्पट झाले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.