Multibagger Stocks: 20 रुपयांच्या शेअरने केले मालामाल! 3 वर्षात गुंतवणूकदारांना दिला दमदार परतावा

Multibagger Stocks: कंपनीचे मार्केट कॅपिटल सुमारे 194.53 कोटी आहे.
Multibagger Stock under rs 20 ashnisha industries delivers whooping 6500 percent returns in just 3 years
Multibagger Stock under rs 20 ashnisha industries delivers whooping 6500 percent returns in just 3 years Sakal
Updated on

Multibagger Stocks: शेअर बाजारात चांगल्या फंडामेंटल्स असणाऱ्या शेअर्सवर फोकस केला तर तुमचा नफा कुठेही जाणार नाही. याशिवाय शेअर बाजारात संयमही तितकाच महत्त्वाचा आहे. असाच एक शेअर आहे अश्नीशा इंडस्ट्रीजचा (Ashnisha Industries).

अश्नीशा इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे, अशात आता हा शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये आहे.अश्नीशा इंडस्ट्रीजने गुजरातमधील एका 3 मेगावॅट क्षमता असणाऱ्या सोलर प्लांटसाठी लेटर ऑफ इंटेटवर (Lol) सही केली आहे.

हा सोलर प्लांट सुरेंद्र नगर जिल्ह्यातल्या पाटडी गावात लावला जाणार आहे. त्यामुळे सध्या हा शेअर वाढीसह 19.26 रुपयांवर ट्रेड करत आहे. अश्नीशा इंडस्ट्रीज ही एक स्टील कंपनी आहे, ज्याचे मार्केट कॅपिटल सुमारे 194.53 कोटी आहे.

3 वर्षांपूर्वी 30 सप्टेंबर 2020 रोजी अश्नीशाचे शेअर्स बीएसईवर फक्त 0.30 पैशांना मिळत होते. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स सुमारे 6,320 टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 64.20 लाख झाले असते.

Multibagger Stock under rs 20 ashnisha industries delivers whooping 6500 percent returns in just 3 years
GST Case : गेमिंग कंपन्यांकडून सरकार वसूल करणार १.५ ट्रिलयन जीएसटी

अश्नीशा इंडस्ट्रीजच्या शेअर्सची कामगिरीही जोरदार आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 652.34 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 2 वर्षात, त्याच्या शेअर्सची किंमत 2,500% ने वाढली आहे.

Multibagger Stock under rs 20 ashnisha industries delivers whooping 6500 percent returns in just 3 years
Ambani Children Salary: वडिलांच्या पावलावर पाऊल, आकाश, अनंत आणि ईशा अंबानींनी केली मोठी घोषणा

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.