Multibagger Stock Updates: जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडच्या (Genus Power Infrastructures Ltd) शेअर्सने गेल्या 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. 20 वर्षात त्याच्या शेअरची किंमत 24,000% पेक्षा जास्त वाढली.
आताही हा शेअर अतिशय मजबूत आहे, गुरुवारी 27 जुलैला त्याचे शेअर्स 4.24% वाढीसह 183.15 रुपयांवर बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यासह बंद झाल्याच्या दिवशी या शेअर्समधील ही तेजी विशेष आहे.
जीनस पॉवरने जीनस मिझोरम एसपीव्ही प्रायव्हेट लिमिटेड नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या अधिसूचनेत दिली, त्यानंतरच त्याच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.
गुरुवारी बीएसईवर जिनस पॉवरचे शेअर्स 183.15 रुपयांवर बंद झाले. पण सुमारे 20 वर्षांपूर्वी हा स्टॉक बीएसईवर केवळ 0.75 पैशावर मिळत होता. तेव्हापासून, त्याच्या किमतींमध्ये सुमारे 24,320 टक्क्यांनी बंपर वाढ झाली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जीनस पॉवरचे शेअर्स सुमारे 116.36 टक्क्यांनी वाढले आहेत. तर गेल्या 3 वर्षात त्यांनी सुमारे 667% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असेल तर त्याचे 2.44 कोटी झाले असते.
दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या शेअरमध्ये फक्त 42,000 रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 कोटी 2 लाख झाले असते.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.