Multibagger Stocks: जीएनए एक्सल्स कंपनीने बोनस शेअर आणि डिव्हिडेंडच्या तारखेत केला बदल, काय आहे नवीन तारीख?

Multibagger Stock Updates: कंपनीचे शेअर्स सध्या एनएसईवर 998 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
Multibagger Stocks
Multibagger StocksSakal
Updated on

Multibagger Stock Updates: स्मॉल-कॅप कंपनी जीएनए एक्सल्स लिमिटेड (G N A Axles Limited) लवकरच डिव्हिडेंड आणि बोनस शेअर्स जारी करणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेट बदलली आहे. जीएनए एक्सल्स लिमिटेड हा एक मल्‍टीबॅगर स्टॉक आहे ज्याने कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्‍तम परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स सध्या एनएसईवर 998 रुपयांवर ट्रेड करत आहेत, तर कंपनीचे मार्केट कॅप 2,138.38 कोटी आहे.

जीएनए एक्सल्स लिमिटेडने प्रति शेअर 6 रुपये डिव्हिडेंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट बदलली आहे. डिव्हिडेंड पेमेंटची नवीन रेकॉर्ड डेट 2 सप्टेंबर 2023 आहे.

तसेच बोनस जारी करण्याची रेकॉर्ड तारीखही बदलली आहे आणि नवीन तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेटही बदलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याची तारीख बदलून 11 ऑगस्ट 2023 ते 2 सप्टेंबर 2023 करण्यात आली आहे.

बोनस शेअर्स शेअरधारकांना 1:1 च्या प्रमाणात जारी केले जातील. याचा अर्थ असा की प्रत्येक 1 इक्विटी शेअरसाठी त्यांना 1 इक्विटी शेअर जारी केला जाईल. मात्र, त्यासाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक असेल.

Multibagger Stocks
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय पण रिफंड मिळालेला नाही? असा तपासा ऑनलाईन स्टेटस

या शेअर्सने गेल्या एका महिन्यात 25 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 42 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांनी 69 टक्के नफा कमावला आहे. इतकेच नाही तर गेल्या 3 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 480% बंपर परतावा मिळाला आहे.

Multibagger Stocks
Financial Tips: गुंतवणूक, बचत आणि कर्ज काढण्यापूर्वी तरुणांनी फॉलो केल्या पाहिजेत अशा 10 सर्वोत्तम फायनान्स टिप्स

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.