Multibagger Stocks: शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशाच स्टॉक्समध्ये अपार इंडस्ट्रीजच्या (Apar Industries) शेअर्सचा समावेश होतो.
अपार इंडस्ट्रीज ही जगातील सर्वात मोठी ऍल्युमिनियम आणि ऍलॉय कंडक्टरची उत्पादक आहे. अवघ्या 20 वर्षात या शेअरने 50 हजारांच्या गुंतवणुकीने गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले.
सध्याच्या पातळीवर गुंतवणूक करूनही चांगला नफा मिळवू शकतो असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या त्याचे शेअर्स 3132.10 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत.
13 जून 2003 रोजी अपार इंडस्ट्रीजचे शेअर्स अवघ्या 15.56 रुपयांना होते. आता ते 3132.10 रुपयांवर गेलेत. म्हणजेच 20 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 20,029 टक्क्यांनी वाढ झाली असून 50 हजार रुपयांची गुंतवणूक एक कोटी झाली आहे.
गेल्या वर्षी 17 जून 2022 रोजी हा शेअर 832.85 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर पुन्हा 11 महिन्यांत जवळपास 296 टक्क्यांनी वाढून हा शेअर 3296.40 रुपयांवर पोहोचला.
कंडक्टर आणि केबल्स सेंगमेंटला जोरदार मागणी असल्याचे अपारच्या मॅनेजमेंटचे म्हणणे आहे. स्पेशालिटी ऑईल सेगमेंटमध्येही परिस्थिती चांगली असेल.
निर्यात आणि प्रीमियम उत्पादनांची मजबूत मागणीमुळे कंपनीला मोठा फायदा होईल असा विश्वास मॅनेजमेंटला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांनी अपार इंडस्ट्रीजमध्ये 3725 रुपयांच्या टारगेटसह गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.