Multibagger Stocks: दीड रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

Multibagger Stocks: 17 ऑगस्ट 2012 रोजी कंपनीचे शेअर्स फक्त 1.49 रुपयांवर होते.
Multibagger Stocks
Multibagger Stockssakal
Updated on

Multibagger Stocks: देशातील सर्वात मोठी होम टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरर आणि एक्सपोर्टर इंडो काउंटच्या शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी पाहायला मिळत आहे. नुकतीच या शेअर्सने इंट्रा-डेमध्ये 3 टक्क्यांहून अधिक तेजीसह एका वर्षातील उच्चांक गाठला.

गेल्या पाच महिन्यांत तो 147% वर चढला आहे. दुसरीकडे लाँग टर्ममध्ये त्याच्या शेअर्सने अवघ्या 11 वर्षांत 60 हजारांच्या गुंतवणुकीसह आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

आता बाजारातील तज्ज्ञ त्यात मोठ्या तेजीची शक्यता वर्तवत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, हे शेअर्स आता ज्या किंमतीवर आहेत, त्यापासून सुमारे 19 टक्क्यांनी वाढू शकतात. सध्या इंडो काउंटचे शेअर्स बीएसईवर 248.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

17 ऑगस्ट 2012 रोजी इंडो काउंटचे शेअर्स फक्त 1.49 रुपयांवर होते. आता ते 248.80 रुपयांवर आहे, म्हणजेच अवघ्या 11 वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात 16598 टक्क्यांनी वाढ झाली आणि ते केवळ 60 हजारांच्या गुंतवणुकीवर कोट्यधीश झाले.

Multibagger Stocks
LICचा अजब निर्णय! घसरणीनंतरही अंबानींच्या कंपनीत केली मोठी गुंतवणूक, विकत घेतला 6.66 टक्के हिस्सा

या वर्षी 28 मार्च 2023 रोजी तो 101.15 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, पाच महिन्यांत, 22 ऑगस्टला तो 147 टक्क्यांहून अधिक वाढून 250 रुपयांवर पोहोचला, जो एका वर्षातील उच्चांक आहे.

इंडो काउंट ही होम टेक्सटाईल निर्मिती आणि निर्यात करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी बेडशीट, गादी-रजाई आणि उशा तयार करते. अमेरिकेतील टॉप 10 मोठ्या बॉक्स रिटेलर्सपैकी 9 रिटेलर्समध्ये ही कंपनी आहे.

Multibagger Stocks
Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सावधान, ही छोटीशी चूक पडू शकते महाग, अशी घ्या काळजी

अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) आणि एक्सपोर्ट इन्सेटीव्ह पॉलिसी भारतीय निर्यातदारांसाठी भरपूर संधी निर्माण करत असल्याचा देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे.

Multibagger Stocks
आयटीसी, भारत फोर्जसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आज मिळवून देतील नफा, तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.