Multibagger Stock: एका वर्षात 'या' शेअरमध्ये 150 टक्के वाढ, नव्या व्यवसायातील एन्ट्रीमुळे तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास

Multibagger Stocks: शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी खुप कमी वेळेत आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत श्रीमंत केले आहे. अशा शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे भांडवल तर वाढतेच शिवाय कंपनीचे व्हॅल्युएशनही वाढते.
Multibagger Stocks Sakuma Exports gave 150 percent return in a year
Multibagger Stocks Sakuma Exports gave 150 percent return in a yearSakal
Updated on

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी खुप कमी वेळेत आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत श्रीमंत केले आहे. अशा शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे भांडवल तर वाढतेच शिवाय कंपनीचे व्हॅल्युएशनही वाढते. अशाच एका शेअरबद्दल आज आम्ही सांगणार आहोत, तर या कंपनीचे नाव सकुमा एक्सपोर्ट्स (Sakuma Exports) आहे. (Multibagger Stocks Sakuma Exports gave 150 percent return in a year)

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. मार्च 2023 मध्ये एनएसईवर शेअरची किंमत 10 रुपयांखाली होती. एनएसईवर 28 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 9.60 रुपये होती. जी आता 25 रुपयांच्या पुढे गेली आहे.

सध्या एनएसईवर हा शेअर 25.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरचा उच्चांक 27.65 रुपये आहे आणि नीचांक 9.25 रुपये आहे. सकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडने 500 कोटीपर्यंतच्या उलाढालीसह मका खरेदी व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. (Sakuma Exports Ltd. Announces Entry Into Maize Procurement Business)

Multibagger Stocks Sakuma Exports gave 150 percent return in a year
Reliance owns Ravalgaon : रावळगावचे मालक अंबानी! महाराष्ट्रातील 82 वर्षे जुनी कंपनी घेतली विकत; 'इतक्या' कोटींची झाली डील

50 कोटीपर्यंतच्या भांडवलासह, या एप्रिल-मे 2024 च्या खरेदी हंगामापासून पूर्व भारतातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी सुरू करण्याची तयारी आहे. हे धोरणात्मक पाऊल उदयोन्मुख बाजारपेठेच्या संधींचा फायदा घेण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आपले स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Multibagger Stocks Sakuma Exports gave 150 percent return in a year
Sovereign Gold Bond: स्वस्त सोने घ्यायचे असेल तर पैसे ठेवा तयार; मोदी सरकारची सुवर्ण योजना 'या' तारखेला होणार सुरू

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.