Multibagger Stocks: टाटा मोटर्सच्या (Tata Motors) आपल्या गुंतवणूकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. लाँग टर्म असो वा शॉर्ट टर्म त्यांनी दोन्ही कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना खुश केले आहे.
टाटा मोटर्सच्या शेअर्सने मागच्या तीन वर्षांत 830 टक्के परतावा दिला आहे. ब्रोकरेजच्या मते त्यात अजूनही आणखी कमाईची क्षमता आहे आणि ती सध्याच्या पातळीपासून 21 टक्क्यांहून अधिक वाढू शकते. सध्या त्याचे शेअर्स बीएसईवर 607.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
3 एप्रिल 2020 रोजी टाटा मोटर्सचे शेअर्स फक्त 65.20 रुपये होते. आता ते 607.15 रुपयांवर गेले आहेत. म्हणजे अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे भांडवल सुमारे 830 टक्क्यांनी वाढले आहे.
गेल्या वर्षी 26 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 375.50 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, 26 जुलै 2023 रोजी तो 7 महिन्यांत 77 टक्क्यांहून अधिक वाढून 665.30 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला.
टाटा मोटर्सला जेएलआरचा मजबूत ऑर्डर बॅकलॉग, वाढती मागणी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल (EVs) वाढती जागरूकता यांचा चांगला सपोर्ट मिळतो आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने यावर 737 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. तर ब्रोकरेज फर्म Emkay ने 750 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग कायम ठेवले आहे.
चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही टाटा मोटर्ससाठी दमदार ठरली आहे. लक्झरी कार्ससह कमर्शियल आणि पॅसेंजर व्हेहिकल विभागातील मजबूत वाढीमुळे त्यांचा नफा वाढला आहे. सप्लाय चेन समस्यांचे निराकरण झाल्यामुळे उत्पादन वाढले.
त्यामुळेच जून तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा 3203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला 5007 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.