Multibagger Stock: 15 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; आणखी तगड्या कमाईचा तज्ज्ञांना विश्वास

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे कधीही खरेदी केले तरी त्यातून दमदार परतावा मिळतो. असाच एक शेअर आहे इंडस्ट्रियल एक्स्प्लोसिव्स निर्माती कंपनी सोलर इंडस्ट्रीजचा (Solar Industries), ज्याने 90 हजारांच्या गुंतवणुकीवर केवळ 15 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
multibagger stocks today solar industries share price gives you profit know performance target price
multibagger stocks today solar industries share price gives you profit know performance target price Sakal
Updated on

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे कधीही खरेदी केले तरी त्यातून दमदार परतावा मिळतो. असाच एक शेअर आहे इंडस्ट्रियल एक्स्प्लोसिव्स निर्माती कंपनी सोलर इंडस्ट्रीजचा (Solar Industries), ज्याने 90 हजारांच्या गुंतवणुकीवर केवळ 15 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

तर, केवळ चार महिन्यांत गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. त्यामुळेच ब्रोकरेजने त्याचे कव्हरेज सुरू केले आहे. ब्रोकरेजच्या मते, सध्याच्या पातळीपासून ते सुमारे 16 टक्क्यांनी वाढू शकतात. आता बीएसईवर हे शेअर्स 6924.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

30 जानेवारी 2009 रोजी सोलर इंडस्ट्रीजचे शेअर्स 62 रुपयांवर होते. आता ते 6924.80 रुपयांवर आहे, म्हणजे केवळ 90 हजार गुंतवून गुंतवणूकदार 15 वर्षांत कोट्यधीश झालेत. गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास, 11 जुलै 2023 रोजी शेअर 3456.95 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.

multibagger stocks today solar industries share price gives you profit know performance target price
Gold Import Duty: सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात शुल्क, किंमतीवर काय परिणाम होणार?

यानंतर, अवघ्या चार महिन्यांत सुमारे 146 टक्क्यांनी झेप घेतली आणि 20 नोव्हेंबर 2023 रोजी 8499 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. पण, शेअर्सची ही वाढ थांबली आणि सध्या या पातळीपासून सुमारे 19 टक्के घसरणीवर आहे.

ब्रोकरेज फर्म हेम सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, कंपनीची निर्यात वाढ, परकीय व्यापार, मायनिंग आणि इंफ्रा सेक्टरकडून चांगली मागणी आणि संरक्षण विभागातील चांगल्या अंमलबजावणीच्या आधारावर चांगली वाढ दाखवत आहे.

multibagger stocks today solar industries share price gives you profit know performance target price
Budget 2024: अर्थसंकल्पात करदात्यांना मिळू शकतो दिलासा; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

त्याचे एबिटदा मार्जिन आर्थिक वर्ष 2025 मध्ये 21-22 टक्क्यांच्या पातळीवर राहू शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून ब्रोकरेजने बाय रेटिंग देऊन आपली कव्हरेज सुरू केले आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी 8020 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()