NBFC Stock: गोल्ड लोन देणाऱ्या 'या' एनबीएफसी स्टॉकमध्ये तेजी येणार, तज्ज्ञांना विश्वास

Manappuram Finance Share Price: गोल्ड लोन देणारी मणप्पुरम फायनान्स (Manappuram Finance) ही कंपनी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांमध्ये एक मोठे नाव आहे. या कंपनीची स्थापना 1950 मध्ये झाली. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे
NBFC Stock Manappuram Finance Share know target axis securities 50 percent return in 2023
NBFC Stock Manappuram Finance Share know target axis securities 50 percent return in 2023 Sakal
Updated on

Manappuram Finance Share Price:

गोल्ड लोन देणारी मणप्पुरम फायनान्स (Manappuram Finance) कंपनी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांमधील मोठे नाव आहे. या कंपनीची स्थापना 1950 मध्ये झाली. सुवर्ण कर्जाव्यतिरिक्त, ही एनबीएफसी आता वाहन कर्ज, सिक्युअर्ड पर्सनल लोन, बिझनेस लोन आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री लोनही देते. सध्या या कंपनीचा शेअर 176 रुपयांवर ट्रेड करतोय.

ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि त्याचे जुने टारगेट 28 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे.

ऍक्सिस सिक्युरिटीजने या स्टॉकसाठी 205 रुपयांचे टारगेट दिले आहे. याआधी ब्रोकरेजने 15 नोव्हेंबरला या स्टॉकसाठी 160 रुपयांचे टारगेट दिले होते. ब्रोकरेजचे यासाठीचे नवे टारगेट 28 टक्क्यांहून अधिक आहे. हा शेअर सध्या 176 रुपयांवर आहे. नवीन टारगेट यापेक्षा 16-17 टक्के जास्त आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी या शेअरने 177.55 रुपयांचा नवा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. या स्टॉकचा ऑल टाइम हाय 225 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 15000 कोटी आहे. या आठवड्यात या स्टॉकमध्ये 2.5 टक्के, एका महिन्यात 16 टक्के, तीन महिन्यांत 25 टक्के आणि वर्ष 2023 मध्ये 52 टक्के वाढ झाली आहे.

NBFC Stock Manappuram Finance Share know target axis securities 50 percent return in 2023
Electricity Supply: ऊर्जेसाठी सरकारला हवी कोळशाची ‘ब्लॅक पॉवर’; मोदी सरकार उभारणार नवे प्रकल्प

आर्थिक वर्ष 2024 मध्ये गोल्ड लोनचे AUM 8-10 टक्क्यांनी वाढू शकते. सध्या एनबीएफसीचे नॉन-गोल्ड लोन AUM 47% आहे. गोल्ड लोन बुक 53% आहे. एनबीएफसीचे टारगेट नॉन-गोल्ड लोन AUM च्या वाढीवर आहे. दोन्ही AUM 50-50 टक्के या प्रमाणात आणण्याचे पहिले टारगेट आहे.

NBFC Stock Manappuram Finance Share know target axis securities 50 percent return in 2023
Small Cap Stock: स्मॉलकॅप पॉवर सेक्टरचा 'हा' शेअर देईल जबरदस्त परतावा, कसा ते जाणून घ्या

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.